Monday, August 31, 2026
Homeभंडाराबँक असिस्टंट मॅनेजरने चांगलाच खेळला ऑनलाईन जुव्वा; लाखोंचे कर्ज झाले अन् बँकेतच...

बँक असिस्टंट मॅनेजरने चांगलाच खेळला ऑनलाईन जुव्वा; लाखोंचे कर्ज झाले अन् बँकेतच टाकला डाका.. -पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील सीतासावंगी गावातील कॅनरा बँकेच्या चिखला शाखेत झालेली १ कोटी ५८ लाख रुपयांच्या चोरीचे प्रकरण पोलिसांनी अर्ध्या दिवसांतच उघडकीस आणले.पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासात बँकेच्या असिस्टंट मॅनेजरनेच चोरी केल्याचे निष्पन्न झाले होते.कारण की,घटना घडल्यानंतर गोबरवाही पोलिसांनी जिल्हा पोलिस अधीक्षक,अप्पर पोलिस अधीक्षक,उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात पथके तयार करुन शोधमोहीम राबविली. बँकेतील कर्मचाऱ्यांची चौकशी केल्यानंतर नेपाळे याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या.त्यामुळे मयूर छबिलाल नेपाळे वय ३२ वर्षे असे चोरट्या असिस्टंट मॅनेजरला
बेड्या ठोकण्यात आल्या.पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने नागपूर येथील त्याच्या पत्नीच्या घरातून मंगळवारी अटक केली होती.गुन्हा केल्यानंतर तो प्रशिक्षणाच्या बहाण्याने नागपूरला पळून गेला होता. सोमवार,१७ नोव्हेंबरच्या रात्री बँकेच्या स्ट्रॉगरूममध्ये घुसून १ कोटी ५८ लाख ४७ हजार ९४४ रुपयांची चोरी झाल्याचा प्रकार दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार १८ नोव्हेंबरला उघडकीस आला होता. त्यामुळे शाखा व्यवस्थापक गणेश सातपुते ३३ वर्षे यांनी गोबरवाही पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.विशेष म्हणजे, बँकेतील संपूर्ण रोख रक्कम,तसेच नऊ सीसीटीव्ही कॅमेरे,एक डीव्हीआर आणि एक संगणक मॉनिटर चोरीला गेल्याचे निदर्शनास आले होते.आपण चोरी केल्याचे पुरावे सापडू नयेत यासाठी मयूर नेपाळे याने आधी सीसीटीव्हीचा डीव्हीआर काढून घेतला. त्यानंतर सर्व कॅमेरेही काढून घेतले.हे सर्व झाल्यावर त्याने स्ट्रांग रूममधून चोरी केली.सर्व रक्कम,कॅमेरे, डीव्हीआर घेऊन तो प्रशिक्षणाच्या नावाखाली नागपूरला पत्नीकडे निघून गेला होता.पोलिसांनी त्याच्याकडून चोरीतील रक्कम, चारचाकी वाहन,सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर जप्त केले.त्यानंतर,त्याची कसून चौकशी केली असता असिस्टंट मॅनेजरला ऑनलाइन गेमिंग,बेटींग व शेअर ट्रेडींगचा नाद लागला होता.याच नादात त्याच्यावर तब्बल ८० लाख रुपयांचे कर्ज झाले होते.ते कर्ज फेडण्यासाठीच त्याने दरोड्याची योजना आखली खरी पण अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला.दरम्यान,त्याच्याकडून ९६ लाख १२ हजार रोख व अन्य साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!