Tuesday, May 26, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांना काँग्रेसचा दणका; पक्षामधून निलंबित..!

देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांना काँग्रेसचा दणका; पक्षामधून निलंबित..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होण्याच्या तीन दिवस अगोदर म्हणजेच शुक्रवार ७ नोव्हेंबरला देसाईगंज नगर परिषद क्षेत्रातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली.विशेष म्हणजे,त्याच दिवशी पक्ष प्रवेश अन् त्याच दिवशी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी घोषित करण्यात आल्याने सर्वजण अवाक् झाले होते.७ नोव्हेंबरला सामाजिक कार्यकर्त्या निता संजय गुरु,देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी तसेच जेष्ठ अधिवक्ता संजय गुरु यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,प्रफुल पटेल,इंद्रनील मनोहरराव नाईक,राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर,सुनील तटकरे व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश केला होता.त्याच वेळेस अजित पवार गटाकडून देसाईगंज नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचीही घोषणा करण्यात आली.यात सामाजिक कार्यकर्त्या निता संजय गुरु यांना देसाईगंज नगराध्यक्ष पदाची उमेदवारी घोषित करण्यात आली.यामुळे ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला.देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी आणि जेष्ठ अधिवक्ता संजय गुरु हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत तसेच ज्येष्ठ नेते म्हणून प्रख्यात होते.
अश्यातच ऐन देसाईगंज नगर परिषद निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास काही दिवस उरलेले असतांनाच काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एंट्री केल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले होते.त्यातच,आता ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचा ‘हात’ सोडणाऱ्यांना काँग्रेसने दणका दिला आहे. देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. काल,बुधवार १९ नोव्हेंबर रोजी प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरुन वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड.गणेश पाटील यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांना ६ वर्षांसाठी निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोबाईलवर अचानक आलेल्या अलर्टने खळबळ.. – पुढील २४ तासांत पाच जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकताच काही वेळापूर्वी अनेक नागरिकांच्या मोबाईलवर अचानकपणे "Extremely Severe Alert" म्हणून संदेश प्राप्त होताच एकच खळबळ उडाली.विशेष म्हणजे,सदरचा संदेश हा अत्यंत गंभीर...

येत्या सोमवारी होणारी लोकशाही दिन सभा रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात येणार होते.जिल्ह्यातील नागरिकांनी...

दोन चिमुकल्या मुलींवर अल्पवयीन मुलाचा अत्याचार..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यात दोन अल्पवयीन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकरणी अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी तात्काळ...

नागपुरात वाहनांच्या चोऱ्या करायचे अन् लाखनीत विकायचे; तिघांना बेड्या..

उद्रेक न्युज  नागपूर :-भंडारा जिल्ह्याच्या लाखनी परिसरात कार्यरत असलेल्या सराईत वाहन चोरांच्या टोळीचा नागपूर गुन्हे शाखा युनिट-एकच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!