- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी(गडचिरोली):- ‘प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना’ अंतर्गत गरोदर महिला आणि स्तनदा मातांना ५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.दिली जाणारी आर्थिक मदत ही तीन हफ्त्यांमध्ये दिली जाते.आरोग्य सुविधेवर गर्भधारणेची नोंदणी करण्यासाठी पहिला हप्ता म्हणून १ हजार रुपये, गर्भधारणेच्या सहा महिन्यांनंतर २ हजार रुपयांचा दुसरा हप्ता तर तिसरा हप्ता बाळाच्या जन्माची नोंदणी आणि लसीकरणाच्या वेळी २ हजार रुपयांचा दिला जातो.असे मिळून तीन हप्त्यांमध्ये ५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते.अशातच आरमोरी तालुक्यातील बऱ्याच गरोदर महिला आणि स्तनदा मातांना एक वर्ष लोटूनही ‘प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना’ अंतर्गत लाभ मिळाला नसल्याने योजनेतील लाभार्थी महिलांना लाभ त्वरित देण्यात यावा; अन्यथा आझाद समाज पार्टी आरमोरीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल; अशा मागणीचे निवेदन तालुका आरोग्य अधिकारी यांना आझाद समाज पार्टीच्या वतीने देण्यात आले.
‘प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना’ ही केंद्र शासनाची योजना जरी असली तरी पात्र लाभार्थींना वेळेवर लाभ मिळणे आवश्यक आहे.सुरुवातीला आशा आणि नंतर निराशा; ही चुकीची बाब असल्याने येत्या दहा दिवसांत प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचे लाभ गरोदर महिला आणि स्तनदा मातांना न मिळाल्यास तालुका आरोग्य कार्यालयासमोर आझाद समाज पार्टीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदन सादर करतेवेळी आझाद समाज पार्टीचे आरमोरी तालुकाध्यक्ष ऋषी सहारे,तालुका कार्याध्यक्ष पुरुषोत्तम मैंद,तालुका महासचिव ॲड.राज सुखदेवे,तालुका सचिव सुरेंद्र वासनिक,शुभम पाटील युवा आघाडी तालुकाध्यक्ष, आरमोरी शहराध्यक्ष नितीन भोवते व आझाद समाज पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.
- Advertisement -

