- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-अमेरिकेच्या मेक्सिको शहरातून आलेल्या विदेशी पाहुण्यांनी आज,गुरुवार दिनांक-२६ सप्टेंबरला गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी येथील रेशीम संगोपन केंद्राला भेट दिली.प्रसंगी राकेश उमरेडकर यांनी सामाजिक कार्यकर्ते खेमराज नेवारे व नरेश वासनिक यांच्याशी संपर्क साधून विदेशी पाहुणे जॅकलीन,अलेक्झांड्रा,जेसिका यांची भेट करून दिली.
भेटी दरम्यान त्यांनी विदेशी पाहुण्यांचे स्वागत करून रेशीम उद्योग विषयावर चर्चा केली.
विदेशी नागरिक आपल्या भारतीय संस्कृतीचा व प्रकल्पांचा अभ्यास करून उद्योग सुरू करतात. मात्र,आपल्याकडे असूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करून घेतो हे विशेष.विदेशी पाहुण्यांनी रेशीम उद्योग निर्मिती केंद्राला भेट देत संपूर्ण माहिती जाणून घेतली.
आरमोरी येथील रेशीम संगोपन केंद्राच्या माध्यमातून कुरखेडा,कोरची,मालेवाडा,धानोरा,देसाईगंज व इतर या भागात रेशीम (कोषा )प्रकल्प निर्माण करून शेतकरी,बेरोजगार,मजूरवर्ग,विणकाम कारागीर यांना नव संजीवनी मिळून काही प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न मिटू शकतो.रेशीम कापड निर्मिती कारखाना वा उद्योग तयार करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते खेमराज नेवारे प्रयत्न करणार असून जिल्ह्यात असे मोठे प्रकल्प राबविण्यात यावेत; यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घालणार आहेत.
- Advertisement -

