Saturday, June 13, 2026
Homeचंद्रपूरपोटाची भाकर हिसकावून घेऊन शेतकऱ्यांना दारिद्र्याच्या खाईत टाकू नये.. - भंडारा-गडचिरोली समृध्दी...

पोटाची भाकर हिसकावून घेऊन शेतकऱ्यांना दारिद्र्याच्या खाईत टाकू नये.. – भंडारा-गडचिरोली समृध्दी मार्गास विरोध..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-विकासाच्या नावाखाली जनतेचा पोशिंदा म्हणवणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य आणि केंद्र सरकार यांच्याकडून भूमिहीन करून पोटाची भाकर हिसकावून घेऊन शेतकऱ्यांना दारिद्र्याच्या खाईत टाकण्याचे काम करीत आहे.मेहनतीने घाम काढून कष्टाने मिळवलेली जमीन कदापि सरकारला देणार नाही,तसे झाल्यास भविष्यात येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. आपल्यावरील होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात बाधित शेतकरी एकत्रित येऊन मोठ लढा उभारण्यासाठी कॉ.विनोद झोडगे पाटील यांच्या नेतृत्वात ब्रम्हपुरी येथील सार्वजनिक बांधकाम विश्राम गृहात शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली.यावेळी मुख्य मार्गदर्शक डॉ.महेश कोपुलवार,डॉ.खुणे,प्रा.तुळशीराम तलमले,आशिष शहारे,अशोक ठेंगरी उपस्थित होते. शेतकऱ्यांवर कदापी अन्याय होऊ देणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही. तोपर्यंत अनेक आंदोलने करून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी राहु,असे मुख्य मार्गदर्शक डॉ.महेश कोपुलवार यांनी कापुलवार उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतांना,नागपूर ते गडचिरोली समृद्धी महामार्ग करण्याची घोषणा केली होती.परंतु,तसे न करता सदर द्रुतगती महामार्ग हा गराडा बुद्रुक तालुका,जिल्हा भंडारा येथून करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रसिद्ध केलेले आहे.महाराष्ट्र महामार्ग अधिनियम १९५५ नुसार सदर महामार्ग तयार होत असल्याने मिळणारा मोबदला शेतकऱ्यांना अतिशय कमी असणार आहे.रेकॉर्ड नुसार दोन पट असणार आहे.सदर मार्गासाठी संपादित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत.परंतु,याचा फायदा भंडारा,चंद्रपूर, गडचिरोली येथील सामान्य जनतेला होणार नाही,हे स्पष्ट आहे.हा महामार्ग कोणासाठी? कार्पोरेट कंपन्यांसाठी. सामान्य जनतेला फायदा काय? भूसंपादन कायदा २०१३ नुसार कोणत्याही प्रकल्पासाठी संपादित करावयाच्या जमिनीसाठी ७० टक्के शेतकऱ्यांची संमती लागते.जमिनीला बाजारभावाच्या चारपट किंमत देण्याचा कायदा असतांना महाराष्ट्राचे सरकार शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित करून रेडिरेकनरनुसार दोन पट भाव देऊन शेतकऱ्यांची बोळवण करणार आहे.आमचे जीवन शेतीवर अवलंबून आहे,तरी सरकारने या महामार्गासाठी आमच्या जमिनी बळजबरीने संपादित करू नये.कारण हा महामार्ग जनतेसाठी नसून कार्पोरेट कंपन्यांसाठी सरकार करत आहे,असा आरोप उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाविरुद्ध लढा उभारण्यासाठी,आपल्या हक्क,अधिकारासाठी बाधित शेतकऱ्यांनी संघटित राहून लढा तीव्र करण्याचे आवाहन विनोद झोडगे यांनी केले आहे.शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी या महामार्गाला वापरून सरकार शेतकऱ्यांना उद्धवस्त करणार आहे.सदर महामार्ग भंडारा,चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेसाठी उपयोगाचा नाही फक्त गडचिरोली जिल्ह्यातील प्रस्तावित २५ खाणींचा कच्चा माल इतर राज्यात नेण्यासाठी सदर द्रुतगती महामार्गाचा वापर सरकार करणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र; ११ जणांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कंत्राटदार,ऑनलाइन सेवा केंद्र संचालक व एजंट यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या बोगस कामगार नोंदणीचे रॅकेट उघडकीस येताच तब्बल ११ जणांवर गुन्हे दाखल...

हायवा ट्रकचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका अनियंत्रित हायवा ट्रकचा अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज, गुरुवार ११ जून रोजी पहाटेच्या सुमारास ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!