- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-प्रेमसंबंधाच्या संशयातून चक्क चुलत दिरानेच आपल्या वहिनीची गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नातेसंबंधाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या पोंभूर्णा तालुक्यातील चेक खापरी गावात उघडकीस आली आहे.संजना थामदेव सोनटक्के वय ३२ वर्षे, रा.चेक खापरी,ता.पोंभूर्णा,जि.चंद्रपूर असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.तर धनराज यादव सोनटक्के वय ३६ वर्षे,रा.चेक खापरी असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती पुढे आली आहे.विशेष म्हणजे,महिलेचे पाच वर्षापासून चुलत दीर धनराज सोनटक्के याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, आरोपी दिराला आपल्या व्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता.या कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.आरोपीने २२ फेब्रुवारीच्या रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास संजनाला घराजवळच असलेल्या विकास पिदुरकर यांच्या शेतात बोलवून वाद घातला.वाद विकोपाला जाताच संतापाच्या भरात आरोपीने वहिनीचा गळा दाबून खून केला आणि घटनास्थळावरून पसार झाला.दुसऱ्या दिवशी २३ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास शेतमालक शेतात गेल्यानंतर संजनाचा मृतदेह आढळून आला.लागलीच घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली देताच पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.प्रकरणाचा पुढील तपास पोंभूर्णा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल ठेंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
- Advertisement -

