- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील कवठी या छोट्याशा गावखेड्यातील २२ वर्षीय कवी अजय राऊत नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देणारे असून साहित्यिक, संस्थापक,समूह प्रशासक, ग्राफिक्सकार; अशी त्यांची ख्याती आहे.राऊत यांचे आईची मिठी,रमलो तुझ्यात,तुझ्यात जीव गुंतला,मी साहित्यिक,ग्रामपंचायत, युवा तू जागा हो,माणुसकी, भ्रष्टाचार व इतर कविता अनेक काव्यसंग्रहात प्रकाशित झाले आहेत.त्यांच्या व्हाट्सअप द्वारे अनेक कवितांना लाखोच्यावर पसंती केली आहे.राऊत यांचे स्वरचित काव्य सातशेच्या जवळपास गेले असून त्यांनी अनेक प्रकारावर आपल्या मनातील काव्य लोकांकडे पोहचवले आहे.(उदा.चाराक्षरी,पंचाक्षरी, षडाक्षरी,सप्ताक्षरी, अष्टाक्षरी,दशाक्षरी,बाराक्षरी,अभंग लेखन,लाडू काव्यलेखन)त्यांना अनेक ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचा सन्मान ही मिळाला आहे.ऑनलाईन संमेलन मध्ये निमंत्रित कवी म्हणून सन्मानित झाले आहेत.त्यांना ऑनलाईन स्पर्धेत फोन पे द्वारे बक्षीस ही मिळाले आहे.त्यांना ऑनलाईन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट,प्रथम,द्वितीय नंबर ही मिळाले असून ऑनलाईन स्पर्धेत काव्यसम्राट पुरस्कार,साहित्य भूषण पुरस्कार,उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार,उत्कृष्ट ग्राफिक्सकार पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे.नवोदित कवी साहित्यिक साठी साहित्य माझे जीवन समूह महाराष्ट्र व साहित्य कला मंच जिल्हा चंद्रपूर या दोन समूहाची स्थापना करून नवोदित साहित्यिक कवींना कविता कशी लिहायची हे त्यांनी प्रशिक्षण सुरु केले.ते दोन समूहाचे संस्थापक असून ते एक उत्तम ग्राफिक्सकार सुद्धा असल्याने त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.त्यांच्या लेखणीतून अनेक नवोदित साहित्यिकांची लेखणी धारदार झाली.महाराष्टातील अश्या अष्टपैलू,सुविख्यात, व्यक्तिमत्व साहित्यिक अजय राऊत यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
- Advertisement -

