Monday, August 31, 2026
Homeनागपूर'सर त्याला पुन्हा दणके द्या...!' हा दररोज अश्लील शिवीगाळ आणि इशारे करतो...-छपरी...

‘सर त्याला पुन्हा दणके द्या…!’ हा दररोज अश्लील शिवीगाळ आणि इशारे करतो…-छपरी रोड रोमियोची धुलाई…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भिवापूर(नागपूर) :-शाळा,महाविद्यालय,बसस्थानक परिसर,उद्यान व इतर सार्वजनिक ठिकाणी छपरी रोड रोमियो विद्यार्थिनी,युवती व महिलांची बऱ्याचदा आपण छेड काढतांना बघितले आहे.रोमियो यांना टोकणारा कुणीही पुढे धजावित नसल्याने अशांची हिम्मत आणखीच वाढत जात असते.त्रासापायी बऱ्याचदा अनेकजण टोकाचे पाऊल उचलतांना दिसून येत आहेत.यावर वेळीच योग्य निर्णय घेतल्यास त्यावर कुठेतरी अंकुश लावल्या जाऊ शकतो.असाच अंकुश लावणारा प्रकार १३ शालेय मुलींच्या बाबतीत उघडकीस आला आहे.वेळ सकाळी ८ वाजताची; अप-डाऊन करणाऱ्या विद्यार्थिनी बसने भिवापूर येथे पोहोचल्यात. गावापासून पाठलाग करणारा विकृत तरुणही मागोमाग आला.त्याच्या तोंडून निघणारी शिव्यांची घाण आणि अश्लील इशाऱ्यांमुळे विद्यार्थिनी प्रचंड घाबरल्यात. यातीलच एका विद्यार्थिनीने याबाबत फोनद्वारे शिक्षकांना सांगितले.लागलीच ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांनी घटनास्थळ गाठत,विकृत तरुणाला सिंघम स्टाइलने चोप दिला व पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवित,त्याला अटकही केली.मंगेश भालचंद्र धनविजय रा.कोलारी,ता.भिवापूर असे आरोपीचे नाव आहे.
काल,शनिवारला २१ सप्टेंबर रोजी सकाळची शाळा असल्यामुळे कोलारी येथील मुली भिवापूरला शाळेत जाण्याकरिता गावातीलच बस थांब्यावर उभ्या होत्या. यावेळी आरोपी नेहमीप्रमाणे त्यांना अश्लील शिव्या देत,इशारे करत होता.मुलींनी त्याकडे दुर्लक्ष करीत, एसटी बसने भिवापूर गाठले.दरम्यान,आरोपीसुद्धा एका दुचाकीने भिवापूरला पोहोचला.मुली बसमधून उतरताच,आरोपीने त्यांना अश्लील शिवीगाळ करीत, यातील एका मुलीला ‘टार्गेट’ केले.आरोपी हातवारे, इशारे करत असल्यामुळे अल्पवयीन मुली प्रचंड घाबरल्यात.यातील एका मुलीने हिंमत करीत,याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांना फोनवरून कळविले. लागलीच शिक्षकांनी घटनास्थळ गाठत आरोपीला जाब विचारला.दरम्यान आरोपीने शिक्षकांचा पाणउतारा करीत,त्यांनाही शिव्या देण्यास सुरुवात केली.माहिती मिळताच ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांनी घटनास्थळ गाठत,आरोपीला धुलाई दिली.तसेच भारतीय न्यायसंहिता कलम ७४, ७८,७९, सहकलम ८,१२ पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवित, आरोपीला अटक केली.
सर त्याला पुन्हा दणके द्या..!👇
गत महिनाभरापासून हा विकृत तरुण अपडाऊन करणाऱ्या अल्पवयीन शालेय मुलींना सतत छेडत आहे.काल,शनिवारला हिंमत करीत,त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगितले.त्यानंतर लागलीच घटनास्थळी आलेल्या ठाणेदार निर्मल यांनी सर्वांसमक्ष या विकृत तरुणाला ‘सिंघम’ स्टाइल’ प्रसाद देण्यास सुरुवात केली.हे पाहून मुलींमध्ये हिंमत आली.त्यांनी ठाणेदार निर्मल यांचा आडोसा घेत,सर त्याला पुन्हा दणके द्या! हा दररोज अश्लील शिवीगाळ आणि इशारे करतो,असे रडकुंडीस येऊन त्या सांगत होत्या.
एसटी बसमध्ये १० ते १६ वर्ष वयोगटातील १३ शालेय मुली होत्या.गुन्हा दाखल करताना,मुलींना हकनाक त्रास होऊ नये; त्यांच्यात पोलिसांबद्दल आपुलकीची भावना निर्माण व्हावी.क्लिष्ट प्रक्रिया केल्यास विद्यार्थिनी पुन्हा पोलिसांकडे भावना व्यक्त करणार नाही.या संपूर्ण बाबींचा विचार करीत,ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांनी पोलिसांना थेट संबंधित शाळेत पाठवित,तेराही मुलींचे बयाण घेतले.त्यानंतर उपनिरीक्षक किरण महागावे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांच्या या लोकाभिमुख भूमिकेबाबत पालकांकडून समाधान व्यक्त्त होत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील विविध परिसरात सलग तीन दिवसांपासून जंगली हत्तींनी शेतशिवारातील धानपिकात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जंगली हत्तींच्या हैदोसाने...

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!