- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पापासून काही अंतरावर असलेल्या पायली-भटाळी जवळील चिंचोली गावाजवळून वाहणाऱ्या इरई नदीच्या पात्रात आज,रविवार ११ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास एक वाघीण मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.मृतक वाघीण अंदाजे तीन वर्षांची असून तिच्या पायाला जखम असल्याची प्राथमिक माहिती आहे.आज सकाळच्या सुमारास चिंचोली गावातील काही नागरिकांना इरई नदीच्या काठावर वाघाचा मृतदेह दिसून आला.गावकऱ्यांनी याबाबत वन विभागास माहिती देताच वनपरिक्षेत्र अधिकारी वारेपूर पथकासह घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोका पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला रवाना केला. शवविच्छेदन अहवालानंतरच पुढील बाबी स्पष्ट होणार असल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. सदरचा मृतदेह हा दोन ते तीन दिवसांपूर्वीचा असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.वाघांचा मृत्यू ही चिंताजनक बाब असून वन विभागासह वन्यजीव प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.
- Advertisement -

