Friday, October 16, 2026
Homeकुरखेडावळण मार्गावर दुचाकीचा अपघात; चालकाचा घटनास्थळीच मृत्यू..

वळण मार्गावर दुचाकीचा अपघात; चालकाचा घटनास्थळीच मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या येंगलखेडा येथील आदिवासी विकास कार्यकारी (आविका)संस्थेच्या संचालकाचा आज,रविवार ११ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास अपघात होऊन घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली.सदरचा अपघात हा तालुक्याच्या सोनसरी-उराडी या वळण मार्गावर झाला.रतीराम घनचू हलामी वय ५० वर्षे, रा.येंगलखेडा,ता.कुरखेडा,जि.गडचिरोली असे अपघातात मृत पावलेल्या संचालकाचे नाव असून ते आज रविवारी सकाळच्या सुमारास एमएच ३३ एजी ९६८६ क्रमांकाच्या दुचाकीने कूलकुली व चवेला येथे गेले होते.तेथील कामे आटोपून दुपारच्या सुमारास देलनवाडी-उराडी-सोनसरी या परतीच्या मार्गावर असतांनाच वळण मार्गावर त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडावर आपटून झाडाला जाऊन जोरदार आपटले.यात रतीराम यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन घटनास्थळीच मृत पावले.मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत याबाबत कुरखेडा पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.घटनेचा पुढील तपास कुरखेडा पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन; राज्यात ५० लाखांहून अधिक अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवून देणाऱ्या महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अधिकाधिक महिलांनी अर्ज करावेत,असे आवाहन आंतरराष्ट्रीय...

अखेर राज्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकांच्या मानधन वितरणाचा मार्ग मोकळा..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम पातळीवर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सहायकांच्या मानधन वितरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून राज्यातील सर्व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!