- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त उद्या,सोमवार १२ जानेवारी ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत राष्ट्रीय युवा दिन व युवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
युवकांचा सर्वांगीण विकास साधणे,त्यांच्यात राष्ट्रप्रेम, सामाजिक जाणीव आणि नेतृत्वगुण विकसित करणे, तसेच राष्ट्रीय व सामाजिक कार्यात सक्रिय सहभागासाठी युवकांना प्रेरित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.राष्ट्र उभारणीमध्ये युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याने सामाजिक उपक्रमांचे आयोजन, नियोजन व अंमलबजावणी प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
युवा सप्ताहाच्या माध्यमातून युवकांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा यथोचित गौरव करण्यात येणार असून,शारीरिक क्षमता वाढविणे,व्यायामाची सवय लावणे व खेळाकडे युवकांना आकर्षित करणे,हे या उपक्रमाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.यासाठी चर्चासत्रे, परिसंवाद,युवा मेळावे,राष्ट्रीय एकात्मता उपक्रम तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या अंतर्गत निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित करण्यात येणार आहेत.जिल्ह्यातील १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवकांनी या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केले आहे.
- Advertisement -

