Saturday, October 17, 2026
Homeचंद्रपूरदोन वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू...- चंद्रपूर ताडोबा वनपरिक्षेत्रातील घटना...   

दोन वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू…- चंद्रपूर ताडोबा वनपरिक्षेत्रातील घटना…   

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर : –ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रांतर्गत असलेल्या चंद्रपूर परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ३७८ मध्ये एका नर वाघाचा मृतदेह आढळला.         घटना रविवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास निदर्शनास आली.वनविभागाने सोमवारी ही घटना उघड केली.दोन वाघांच्या झुंजीत एका नर वाघाचा मृत्यू झाला असावा,असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कक्ष क्रमांक ३७८ मधील ३० हेक्टर मिश्र रोपवनातील टीसीएममध्ये रविवारी गस्तीदरम्यान एका वाघाचा मृतदेह आढळला.घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्राप्त होताच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बफरचे उपसंचालक,सहायक वनसंरक्षक,राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणचे बंडू धोत्रे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.घटनास्थळाचा पंचनामा करून वाघाचा मृतदेह उपचार केंद्रात हलविण्यात आला.

सोमवारी वाघाच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली.यानंतर मृतदेहावर अग्निसंस्कार करण्यात आले.यावेळी प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर,उपसंचालक बंडू धोत्रे, वनपरिक्षेत्र अधिकारी भांडककर,वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती म्हैसकर,पशुवैद्यकीय अधिकारी खोब्रागडे उपस्थित होते. वाघाचा मृत्यू दोन वाघांच्या झुंजीत झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विविध शिष्यवृत्तीसाठी एनएसपी व महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणीचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अर्ज केंद्र शासनाच्या राष्ट्रीय...

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!