Monday, August 31, 2026
Homeकोरचीमजुराला बेदम मारहाण करणाऱ्या वन अधिकारी,वन कर्मचाऱ्यांना निलंबित करा- शिवसेनेची मागणी- कोरची...

मजुराला बेदम मारहाण करणाऱ्या वन अधिकारी,वन कर्मचाऱ्यांना निलंबित करा- शिवसेनेची मागणी- कोरची तालुक्यातील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली (कोरची):- कोरची तालुका मुख्यालयापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या धोलिकसा ते नाडेकल या रत्याचे काम सुरू आहे.सदर कामावर ट्रॅक्टरने गिट्टी टाकण्याचे काम सुरू असून कामावर गिट्टी टाकून चालक राजेंद्र वरखडे व सोबत मजूर मयाराम ताडामी परत येत असतांना पुराडा वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिघोरे व सोबत असलेले वनरक्षक गावड व वनकर्मचारी यांनी ट्रकटर थांबविले आणि चालकास उतरण्यास सांगितले. मयाराम ताडामी यालाही उतरविले आणि कोणतीही चौकशी न करता बेदमपणे बांबू आणि लाठया काठ्यानी मारण्यास सुरवात केली.यात मयाराम ताडामी गंभीर जखमी झाल्याने  तात्काळ कोरची दवाखान्यात भरती करण्यात आले.मार जास्त असल्याने कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात भरती केले.मारहाण करणारे वनरक्षक गावड सोबतची चमू यांनी भरपूर दारू पिऊन असल्याचे आज २८ फेब्रुवारीला बेडगाव येथील जखमी मजूर ताडामी व चालक वरखडे ची भेट घेतली व हकीकत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाणून घेतली.मजूराला व ड्रायव्हरला वन अधिकाऱ्यांना मारण्याचा अधिकार कुणी दिला.काही दिवसांपूर्वी अमर कन्स्ट्रकशनचे पुराडा मालेवाडा रस्त्याचे काम सुरू होते.

तिथेही वन कर्मचाऱ्यांनी रस्त्यावार उभी असलेली जेसिपी अटक केली व खोटे गुन्हे दाखल करून जेलमध्ये पाठविले.तसेच ३ ते ४ महिन्यांपूर्वी अंतरगाव परिसरात शेती जवळील काठ्या-कुठ्या जेसीपी ने साफ- सफाई करतांना जेसिपिला अटक केली.नंतर देवाण-घेवाण करून दुसऱ्या दिवशी कारवाही न करता सोडून दिले.असा आतंक पूराडा वन परिक्षेत्रातील अधिकारी,कर्मचाऱ्यांनी सुरू केला.यामुळे सर्व साधारण जनता विकासाचे काम करणाऱ्यावर खोटी कारवाहीची दहशत पसरली आहे.तरी वन परिक्षेत्र अधिकारी दिघोरे,वनरक्षक गावडे सोबतची चमू तसेच वनरक्षक ढवळे यांना निलंबित करावे; अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल,कोरची तालुका प्रमुख डॉ.नरेश देशमुख,लोकेंद्र शहा,सयाम मुजहीन शेख,गुरुदेव मेश्राम,कामगार सेनेचे अनिल उईके यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!