Tuesday, September 22, 2026
Homeकोरचीबचत गटाचे कर्ज डोईजड; विष प्राशन करून केली आत्महत्या.. - कोरची तालुक्यातील...

बचत गटाचे कर्ज डोईजड; विष प्राशन करून केली आत्महत्या.. – कोरची तालुक्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-आपली जेवढी आर्थिक क्षमता आहे;तितकीच सीमा ओलांडणे गरजेचे आहे.’अंथरूण पाहून पाय पसरावे’ या म्हणीचा अनेकजण उल्लंघन करतांना दिसून येतात.तर काहीजण जवळ असूनही मोठी हाव करून सर्वकाही गमावून बसतात.अश्याच प्रकारे गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यात एका ५० वर्षीय इसमाने तीन लाख रुपये घेतलेल्या एका बचत गटाचे कर्ज डोईजड झाल्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आणि खरोखरच जीव गमावला असल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधराम हरिसंग गायकवाड वय ५० वर्षे, रा.हेटाळकसा, ता.कोरची,जि.गडचिरोली असे विष प्राशन करून जीवनयात्रा संपविलेल्या इसमाचे नाव आहे.हेटाळकसा येथील बुधराम गायकवाड यांनी काही महिन्यांपूर्वी एका बचत गटाकडून तीन लाख रुपयांचे  कर्ज घेतले होते. काही महिन्यांनी बचत गटाचे कर्ज फेडणे आवश्यक होते. पण,उचल केलेली रक्कम मोठी असल्याने एवढी मोठी रक्कम कुठून भरावी?अशी चिंता बुधराम यांच्या मनात सतत घर करून सोडू लागली.कर्जाची रक्कम फेडण्याच्या चिंतेत असलेल्या बुधराम यांनी गुरुवारच्या रात्री साडे दहाच्या सुमारास कीटकनाशक फवारणीचे औषध घरीच प्राशन केले. सदरची बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच लागलीच कुटुंबीयांनी त्याच रात्री त्यांना कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.रात्री उचार झाल्यानंतर काल शुक्रवारी प्रकृती खालावल्याने त्यांचा रुग्णालयातच मृत्यू झाला.घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाने कोरची पोलिसांना देताच पोलिसांनी शवविच्छेदन अहवालानंतर बुधराम यांचा मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केला.प्रकरणाचा पुढील तपास कोरची पोलिस प्रशासन करीत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!