Tuesday, September 22, 2026
Homeकोरचीट्रकची दुचाकीला जोरदार धडक; पत्नी जागीच ठार तर पतीचा एक पाय तुटला.....

ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; पत्नी जागीच ठार तर पतीचा एक पाय तुटला.. – कोरची तालुक्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोरची(गडचिरोली):-दुचाकीस्वार पती-पत्नी कोरची तालुक्यातील झगडवाही येथे जात असतांना वाटेतच  कोरची-कुरखेडा मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली.धडक बसताच दुचाकीस्वार पती-पत्नी खाली कोसळले.यात पत्नीच्या अंगावरून ट्रक गेल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला तर पतीचा एक पाय तुटला असल्याची घटना आज,शनिवार ३१ मे रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.घटना घडताच ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला.रेवता राजाराम उसेंडी वय ६० वर्षे रा.जामटोला,ता.कोरची असे मृतक पत्नीचे नांव असून राजाराम उसेंडी वय ६५ वर्षे असे अपघातातील गंभीर जखमीचे नाव आहे.
माहितीनुसार,राजाराम उसेंडी व पत्नी रेवता हे दोघेही दुचाकी क्रमांक-एमएच३३ ए ६४२५ ने झगडवाही येथील नातेवाईकाची प्रकृती बघण्यासाठी जात होते.अशातच कोरची मुख्यालयापासून आठ किलोमीटर अंतरावर कोरची-कुरखेडा मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की, दोघेही रस्त्यावर कोसळले.यात रेवता यांच्या शरीरावरून ट्रक गेल्याने शरीराचा पूर्ण चेंदामेंदा झाला व राजाराम यांचा पाय पूर्णपणे तुटून गंभीर दुखापत  झाली.घटना घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेला संपर्क साधला. मात्र,रुग्णवाहिका न आल्याने राजाराम उसेंडीला तातडीने खासगी वाहनाने कोरची ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.तिथे प्राथमिक उपचारा नंतर पुढील उपचाराकरिता गडचिरोली सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!