Friday, June 19, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआज रंगणार आयपीएलचा थरार; जो जिंकेल तो फायनल खेळणार..

आज रंगणार आयपीएलचा थरार; जो जिंकेल तो फायनल खेळणार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आयपीएल-२०२५ म्हणजेच
इंडियन प्रीमियर लीगचे सामने आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपले असून येत्या मंगळवार ३ जून रोजी अंतिम सामना होणार आहे.अश्यातच आज,रविवार १ जून ला  क्वालिफायर-२ सामना मुंबई इंडियन्स वर्सेस पंजाब किंग्ज यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता खेळला जाणार आहे. सदर होणाऱ्या सामन्यातील विजेता संघ येत्या ३ जून रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)शी सामना करेल,ज्यांनी आधीच क्वालिफायर-१ जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करून मुंबईने क्वालिफायर-२ मध्ये स्थान मिळवले आहे.दोन्ही संघ प्लेऑफमध्ये प्रथमच एकमेकांसमोर येतील.त्याच वेळी,दोघेही हंगामात दुसऱ्यांदा एकमेकांसमोर येतील.गेल्या वेळी पंजाबने मुंबईला ७ विकेट्सने हरवले होते.आजचा क्वालिफायर-२ सामना- एमआय विरुद्ध पीबीकेएस,स्टेडियम- नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद,वेळ-नाणेफेक  संध्याकाळी ७ वाजता, सामना सुरू -संध्याकाळी ७३० वाजता.
आयपीएलमध्ये आतापर्यंत मुंबई आणि पंजाब यांच्यात एकूण ३३ सामने खेळले गेले आहेत. एमआयने १७ मध्ये आणि पीबीकेएसने १६ मध्ये विजय मिळवला.आता दोन्ही संघ या मैदानावर पहिल्यांदाच एकमेकांसमोर येणार असल्याने क्रिकेट प्रेमींसाठी रंगतदार सामना उत्साहित करणारा ठरणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

माजी सैनिकास पैश्याची मागणी; महिला लिपिक एसीबीच्या कचाट्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-एका ३६ वर्षीय महिला लिपिकेस(महसुल सहाय्यक)माजी सैनिक यांचे ताब्यात असलेली सिलींगची अतिक्रमीत जमीन माजी सैनिक म्हणुन त्यांचे नावावर नियमीत करुन देण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!