Wednesday, September 23, 2026
Homeकोरचीधक्कादायक..! टीव्ही वरील "माझा आवडता चॅनल पाहू दिला नाही" म्हणून इयत्ता...

धक्कादायक..! टीव्ही वरील “माझा आवडता चॅनल पाहू दिला नाही” म्हणून इयत्ता चौथीत शिकणाऱ्या मुलीने गळफास घेऊन केली आत्महत्या…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोरची(गडचिरोली):-अवघ्या क्षुल्लक कारणावरून दोघा बहिणींमध्ये टिव्ही पाण्यावरून किरकोळ वाद झाला आणि इयत्ता चौथीत शिकणाऱ्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यातील बोडेना गावात सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने कुटुंबियांवर मोठा आघात होऊन परिसरात शोककळा पसरली आहे.इयत्ता चौथीत शिक्षण घेणारी १० वर्षीय सोनाली आनंद नरेटी रा.बोडेना,ता.कोरची, जि.गडचिरोली असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या चिमुकलीचे नाव आहे.सदरची घटना काल, गुरुवारी २१ मे च्या सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान घडली.
माहितीनुसार,मृत सोनाली,१२ वर्षीय मोठी बहीण संध्या व ८ वर्षीय लहान भाऊ सौरभ हे तिघेही सध्या गोंदिया जिल्ह्यातील कोकना खोबा गावातील एका खासगी आश्रम शाळेत शिकत होते.शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने तिघेही मुळ गाव बोडेना येथे आले होते.घरी आई मंगला आणि सर्वात लहान भाऊ शिवम राहतात.काल,गुरुवारी सकाळच्या सुमारास सोनाली ही टिव्ही पाहत होती.अश्यातच सोनालीची मोठी बहीण संध्या हिच्यासोबत टीव्हीच्या रिमोट वरून किरकोळ वाद झाला.किरकोळ वाद होताच सोनाली हिने रागाच्या भरात “माझा आवडता चॅनल पाहू दिला नाही” म्हणत घरच्या मागील बाजूस असलेल्या पेरूच्या(जांबाचे झाड)झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.घटनेची माहिती कळताच कोरची पोलीस ठाण्याचे ठाणेदार शैलेश ठाकरे,पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून मृतदेह कोरचीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला.अवघ्या क्षुल्लक कारणावरून चिमुकलीने टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बँकेची कामे असतील तर लवकर उरकून घ्या; सलग ५ दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेबाबत मार्गदर्शन.. -योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू ४० विद्यार्थ्यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत...

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!