Friday, June 19, 2026
Homeकोरचीजंगली डुकराच्या हल्ल्यात महिला जखमी..

जंगली डुकराच्या हल्ल्यात महिला जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोरची(गडचिरोली):-ग्रामीण भागात तेंदूपाने तोडण्याचा हंगाम सुरू झाला असून गावातील नागरिक जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी जात आहेत.अशातच तेंदूपाने तोडत असतांनाच एका महिलेवर जंगली डुकराने हल्ला चढवून जखमी केल्याची घटना काल बुधवारी कोरची तालुक्याच्या बिहटेकला येथे घडली.ऊर्मिला संतोष मिरी वय ४८ वर्षे,रा.बिहटेकला, ता.कोरची, जि.गडचिरोली,असे जंगली डुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.हल्ल्यात ऊर्मिलाच्या उजव्या पायाला व कमरेला दुखापत झाली असून तेंदूपाने संकलनासाठी बिहटेकला गावातील पलटण गंगाकाचूर,ज्योती टाटपलान,भारती ताटपलान,करिष्मा टाटपलान आणि ऊर्मिला मिरी जंगलात गेल्या होत्या.पाने तोडत असतांनाच अचानकपणे ऊर्मिलावर रानडुकराने हल्ला चढवला. त्यामुळे इतर महिला घाबरून ओरडल्या.ओरडताच जंगली डुकराने जंगलात धूम ठोकली.त्यानंतर
ऊर्मिलास ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून तिला गडचिरोली जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.बेळगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत ठाकरे यांनी भीमपूरचे वनरक्षक माही कुंजाम,कोटराचे क्षेत्र सहाय्यक अतकरे यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले व जखमी महिलेस भरपाईचे आश्वासन दिले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

माजी सैनिकास पैश्याची मागणी; महिला लिपिक एसीबीच्या कचाट्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-एका ३६ वर्षीय महिला लिपिकेस(महसुल सहाय्यक)माजी सैनिक यांचे ताब्यात असलेली सिलींगची अतिक्रमीत जमीन माजी सैनिक म्हणुन त्यांचे नावावर नियमीत करुन देण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!