Wednesday, September 23, 2026
Homeनागपूरडोक्यात संशयाचा भूत संचारला अन् तीन वर्षाचे प्रेमसंबंध एका झटक्यात खतम..!

डोक्यात संशयाचा भूत संचारला अन् तीन वर्षाचे प्रेमसंबंध एका झटक्यात खतम..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-डोक्यातील सर्व रोग परवडणारे आहेत; मात्र,एकदा कां संशयाचा भूत डोक्यात संचारला तर काहीही केलं तरी तो पिच्छाच सोडेना..! त्यामुळे त्यापासून चार हात दूर राहिलेलं बरं.अशातच नागपूरच्या गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दाभा येथे प्रियकराच्या डोक्यात संशयाचा भूत संचारला आणि तीन वर्षांपासून जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रेयसीची प्रियकराने हत्या केली.२६ वर्षीय अक्षय प्रभाकर दाते असे प्रेयसीची हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.तर हेमलता किशोर वैद्य वय ३२ वर्षे,एकांशी सोसायटी,दाभा असे मृत तरुणीचे नाव आहे.दोघेही वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट  तालुक्यातील सवालीवाघ येथील रहिवासी होते.
हेमलता आणि अक्षय यांचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते.दोघांचेही एकमेकांवर जीवापाड प्रेम होते.दोघेही कामानिमित्त नागपुरात आले होते.हेमलता ही एकांशी सोसायटीतील पीस रेसिडेन्सी येथे रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला होती.तर अक्षय हा बिग बास्केटमध्ये नोकरी करत होता.दोघेही विवाह बंधनात अडकणार होते. अशातच काही दिवसांपासून अक्षयच्या डोक्यात संशयाचा भूत संचारला होता.त्यामुळे तो थोड्या- थोड्या गोष्टीसाठी तिच्याशी वाद घालायचा व इतर कुणाशी हेमलताचे चक्कर तर नाही ना विचारात पडला होता.मंगळवारी अक्षय सोसायटीत गेला असता हेमलता ही एका व्यक्तीशी बोलत होती.त्यामुळे अक्षयने तिच्याशी वाद घातला.वादाचे अवसान डोक्यात गेले व त्याने हेमलताच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार केला व घटनास्थळावरून पळून गेला.सोसायटीतील नागरिकांनी पीस रेसिडेन्सीचे बिल्डर अभिषेक केवलरामानी यांना याची माहिती दिली व नागरिकांनी हेमलताला मेयो इस्पितळात घेऊन गेले.मात्र,उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आणि तीन वर्षाचे प्रेमसंबंध एका झटक्यात खतम झाले.पळून गेलेला आरोपी अक्षयला अमरावती येथून अटक करून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक...

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!