Tuesday, July 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअंगणवाडी सेविकांना मोठे यश....- शासनाशी सकारात्मक चर्चा..

अंगणवाडी सेविकांना मोठे यश….- शासनाशी सकारात्मक चर्चा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

प्रतिनिधी/आकाश धाकडे 

उद्रेक न्युज वृत्त :- राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाच हत्यार उपसले. या आंदोलनाची दखल राज्य सरकारला अखेर घ्यावी लागली आहे. मुंबईतल्या आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी ठिय्या आंदोलन सुरु केले होते.तर काही अंगणवाडी सेविका थेट रायगड किल्ल्यावर पोहोचल्या.त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीसमोर आंदोलन केले.मुंबईतील आझाद मैदावर आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या होत्या. मागण्या पूर्ण होईपर्यंत मैदान सोडणार नसल्याचा पवित्रा अंगणवाडी सेविकांनी घेतला.राज्य सरकारने साडेपाच तर केंद्राने गेली साडेचार वर्षे मानधनात कुठलीही वाढ दिलेली नाही.यासह अनेक मागण्यासाठी अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या होत्या.त्यानंतर हा प्रश्न विधानसभेतही उपस्थित करण्यात आला.

अंगणवाडी सेविकांसाठी गोड बातमी

अंगणवाडी सेविकांसोबत राज्य सरकारने सकारात्मक चर्चा केली आहे.अंगणवाडी सेविकांना दीड हजार रुपये मानधन वाढवून मिळणार आहे.अंगणवाडी सेविकांसाठी सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजनाही सुरु केली जाणार आहे.तसेच अंगणवाडी सेविकांना मोबाइल दिले जाणार आहेत.अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाबाबत तातडीची बैठक घेण्यात आली.सेविकांचे शिष्टमंडळ आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यात चर्चा सुरु झाली.मुख्यमंत्र्याच्या आदेशाने ही बैठक झाली.या बैठकीत आज तोडगा काढण्याबाबत प्रयत्न झालेत.त्यात यशही आले.दरम्यान,माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सरकारवर गंभीर आरोप केला होता.अंगणवाडी सेविका २८ जून २०२२ रोजी पगार वाढ करण्यासाठी फाईल अर्थ विभागकडे पाठवण्यात आली होती.त्यामध्ये १० हजार वाढण्यासाठी मागणी करण्यात आली होती.मात्र,आठ महिन्यांपासून फाईलकडे यासरकाने ढुंकूनही पाहिले नाही,असे यशमोती ठाकूर यांनी आरोप करताना म्हटले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!