Thursday, April 30, 2026
Homeचंद्रपूरदारू पिऊन म्हणायचा 'मी एक दिवस मरून जाईन'; अन् खरोखरच मरून गेला..!

दारू पिऊन म्हणायचा ‘मी एक दिवस मरून जाईन’; अन् खरोखरच मरून गेला..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-दारू पिणाऱ्यांचे काही खरे नाही.कधी काय बोलतील याचा काही नेम नाही.त्यामुळे अश्यांच्या गोष्टींकडे अनेकजण दुर्लक्ष करून घेतात.पण, काहीजण दारूच्या नशेत जे काही बोलतात ते प्रत्यक्षात कृतीही करून दाखवत असतात.अशीच काहीशी घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यात नुकतीच उघडकीस आली आहे.तो नेहमी म्हणायचा की,मी एक दिवस मरून जाईन,दारूच्या नशेत बोलायचा त्यामुळे कुटूंबीय तसेच नातलगांनी दुर्लक्ष केले.मात्र,काल मंगळवारचा दिवस उजळला आणि तो खरोखरच मरून गेला.विशेष म्हणजे, सोमवारी २८ जुलैला कुटुंबीयांनी त्याची समजूत काढत,असे नको करुस म्हणून सांगितले.पण,त्याने कुटुंबीयांचे न ऐकता काल,मंगळवारी २९ जुलैला दुपारच्या सुमारास बकरी पालन शेडमध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.सदरची घटना सावली तालुक्यातील गेवरा बुज येथे घडली असून प्रशांत विठ्ठल चौधरी वय ३२ वर्षे,रा.गेवरा बुज,ता.सावली असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.शेवटी मरून गेला,पण कुटुंबीयांना धक्का देऊन गेला.आई- वडील लहानाचे मोठे करतात.जीवापाड प्रेम करून पालनपोषण करतात,थोडे जरी लागले वा बरे वाटत नसल्यास तात्काळ काळजी करून दवाखान्यात नेत असतात.पण क्षुल्लकशा कारणावरून अनेकजण जीवाचे बरे-वाईट करून घेतात.घटना घडताच पाथरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितेश डोर्लीकर,मडावी,कोरे, गायकवाड,खंडाळे,शेंडे,बारेकर आदींनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद करून शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयाकडे सुपूर्द केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नक्षलमुक्तीचा ठेवा..! स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७ वर्षात प्रथमच जिल्हाधिकारी गडचिरोलीच्या दुर्गम भागात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या व छत्तीसगडच्या सीमेवरील अत्यंत दुर्गम व नक्षल प्रभावित भामरागड तालुक्याच्या बीनागुंडा आणि लाहेरी या भागात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७...

पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘जीवनदायिनी’.. गडचिरोली जिल्ह्यात ३१ रुग्णांना तब्बल ३१ लाख ३५ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे.गडचिरोली जिल्ह्यात आर्थिक वर्षात...

पोटात दुखू लागल्याने झाला भांडाफोड; अल्पवयीन विद्यार्थिनी आठ महिन्यांची गर्भवती.. – तरुणावर अत्याचार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वयात आल्यानंतर मुला-मुलींमध्ये एकमेकांविषयी आकर्षण वाढते आणि तिथूनच पुढे सुरू होतेय अनोखी 'लव्हस्टोरी' ही काही सांगण्याची गरज नाही.पण,अल्पवयीनांची 'लव्हस्टोरी' चिरकाल टिकणारी...

आता ‘त्या’ आमदार अन् खासदारांना उठून अभिवादन करण्याची गरज नाही..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील कित्येक आमदार आणि खासदारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. अश्यातच काहीजणांवर फौजदारी कारवाई झालेली वा इतर प्रकरणात दोषी ठरलेले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!