Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीराज्याच्या इतिहासातील पहिलीच घटना..! येत्या शुक्रवारी राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल भा.पांडे...

राज्याच्या इतिहासातील पहिलीच घटना..! येत्या शुक्रवारी राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल भा.पांडे गडचिरोलीत.. – माहिती अधिकार अर्जातील द्वितीय अपीलांवर होणार सुनावणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असा योगायोग आलेला म्हणावे लागेल की, ‘माहिती अधिकार कायदा २००५’ अंतर्गत द्वितीय अपिलांवर निर्णय घेण्याकरिता चक्क रज्याच्ये मुख्य माहिती आयुक्त गडचिरोलीत सुनावणी घेत आहेत.नाहीतर यापूर्वी नागपूर खंडपीठात जाऊन हजेरी लावावी लागत होती. माहितीच्या अधिकाराखाली दाखल करण्यात आलेल्या द्वितीय अपीलांवर निर्णय घेण्यासाठी राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल भा. पांडे यांची गडचिरोली जिल्ह्यात विशेष सुनावणी आयोजित करण्यात आली आहे.येत्या,शुक्रवार १ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ही सुनावणी पार पडणार आहे.
राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या या सुनावणीत नागपूर खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त गजानन निमदेव हे देखील उपस्थित राहून जिल्ह्यातील विविध सार्वजनिक प्राधिकरणांशी संबंधित सुमारे शंभर द्वितीय अपील प्रकरणांवर सुनावणी घेणार आहेत.या सुनावणीदरम्यान प्रलंबित अपील प्रकरणांवर प्रभावी निर्णय घेत नागरिकांना माहिती अधिकाराच्या अंमलबजावणीत न्याय देण्याचा उद्देश आहे.त्यामुळे संबंधित द्वितीय अपीलकर्त्यांनी तसेच संबंधित सार्वजनिक प्राधिकरणांचे अधिकारी/प्रतिनिधींनी वेळेवर उपस्थित राहावे,असे आवाहन राज्य माहिती आयोगाच्या उपसचिव रोहिणी जाधव यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

नक्षलमुक्तीचा ठेवा..! स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७ वर्षात प्रथमच जिल्हाधिकारी गडचिरोलीच्या दुर्गम भागात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या व छत्तीसगडच्या सीमेवरील अत्यंत दुर्गम व नक्षल प्रभावित भामरागड तालुक्याच्या बीनागुंडा आणि लाहेरी या भागात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७...

पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘जीवनदायिनी’.. गडचिरोली जिल्ह्यात ३१ रुग्णांना तब्बल ३१ लाख ३५ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे.गडचिरोली जिल्ह्यात आर्थिक वर्षात...

पोटात दुखू लागल्याने झाला भांडाफोड; अल्पवयीन विद्यार्थिनी आठ महिन्यांची गर्भवती.. – तरुणावर अत्याचार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वयात आल्यानंतर मुला-मुलींमध्ये एकमेकांविषयी आकर्षण वाढते आणि तिथूनच पुढे सुरू होतेय अनोखी 'लव्हस्टोरी' ही काही सांगण्याची गरज नाही.पण,अल्पवयीनांची 'लव्हस्टोरी' चिरकाल टिकणारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!