Wednesday, August 19, 2026
Homeचंद्रपूरतेंदूहंगाम संकटात; आज सकाळी वाघाच्या हल्ल्यात ३० वर्षीय महिला ठार.. - तीन...

तेंदूहंगाम संकटात; आज सकाळी वाघाच्या हल्ल्यात ३० वर्षीय महिला ठार.. – तीन दिवसांत पाचवा बळी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्यात गोर-गरीब,सर्वसामान्य नागरिकांच्या रोजगाराचे साधन असलेल्या तेंदूहंगामावर वन्य प्राण्यांचे सावट आले असल्याचे दिसून येत आहे.आजच्या घटनेने वाघाच्या हल्ल्यात अवघ्या तीनच दिवसात पाचवा बळी गेला आहे. शनिवार १० मे रोजी सिंदेवाही तालुक्यातील मेंढा माल येथे तेंदू पाने तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या शुभांगी मनोज चौधरी,कांता बुधा चौधरी,रेखा शालिक शेंडे या महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.तर काल,रविवारी ११ मे रोजी सकाळच्या सुमारास मूल तालुक्यातील चिचपल्ली वनपरीक्षेत्रातील नागाळा बिटात ६५ वर्षीय विमल बुधाजी शेंडे रा.नागाळा, ता.मूल हिच्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच परत आज,सोमवार १२ मे रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास मूल तालुक्यातील भादुर्णा बिटातील कक्ष क्रमांक- ७९३ मध्ये ३० वर्षीय भूमिका दिपक भेंडारे,रा.भादुर्णा, ता.मूल,जि.चंद्रपूर हिच्यावर जंगलात तेंदूपाने तोडत असतांना वाघाने हल्ला करून ठार केले आहे.आजच्या घटनेनुसार तीन दिवसांत पाच महिला वाघाच्या हल्ल्याचे बळी ठरल्या आहेत.
मूल तालुक्यातील भादुर्णा येथील भाऊजी गावतुरे यांची मुलगी भूमिका हिचा विवाह केवाडा (पेठ) येथील दिपक भेंडारे सोबत झाला होता.काही वर्ष सासरी राहीली. त्यानंतर ती वडीलांकडे भादुर्णा येथे राहायला गेली होती.येथेच स्वतःच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पती-पत्नी मिळेल ते काम करीत होते.अश्यातच आज सोमवारी सकाळच्या सुमारास भादुर्णा जंगलात भूमिका व तिचे कुटुंबीय तेंदूपाने तोडण्यासाठी गेले होते.जंगलात तेंदूपाने तोडत असतांनाच जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने भूमिका हिच्यावर अचानकपणे हल्ला केला. हल्ल्यात ती जागीच ठार झाली.वाघाने हल्ला केला तेव्हा काही अंतरावर असलेल्या आई,वडील आणि पतीने आरडाओरड करून तिचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला.परंतु,ती जागीच गतप्राण झाली होती.घटनेनंतर मृतदेह उचलण्यास महिलेच्या कुटुंबीयांनी नकार दिला. त्यामुळे काहीकाळ घटनास्थळी तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन मृतक महिलेच्या कुटुंबीयांची व नागरिकांनी समजून काढल्याने मृतदेह उचलण्यात आला.मुल आणि सिंदेवाही तालुक्यात तीन दिवसांमध्ये पाच जणांचा बळी गेल्याने वाघाची प्रचंड दहशत पसरली असल्याने वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खुद्द पत्नीनेच प्रियकर दिराच्या मदतीने पतीचा काढला काटा.. -अनैतिक संबंधाचा बिन भाड्याच्या खोलीत ‘दी एंड’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-अनैतिक संबंधात आडकाठी येणाऱ्या पतीचा खुद्द पत्नीनेच प्रियकर चुलत दिराच्या मदतीने काटा काढल्याची घटना वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील वडनेर पोलिस ठाण्याच्या...

विद्यमान आमदारांच्या पीए व वाहनचालकांच्या मानधनात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या विद्यमान आमदारांचे स्वीय सहाय्यक म्हणजेच पीए आणि वाहनचालकांच्या मानधनात दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.सदरची...

सावधगिरी बाळगा..! नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लोन किंवा ट्रेडिंग ॲपवर विश्वास ठेवू नये..

उद्रेक न्युज वृत्त :-अल्पावधीत ट्रेडिंगच्या माध्यमातून लखपती करण्याचे तसेच तात्काळ कर्ज देण्याचे आमिष दाखवून अनधिकृत डिजिटल लेंडिंग ॲप्स आणि संशयास्पद कंपन्यांकडून नागरिकांची आर्थिक फसवणूक...

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित.. आता सर्पदंशाची प्रत्येक घटना,विषप्रतिबंधक लसीचा साठा,केलेले उपचार व मृत्यूची नोंद करणे बंधनकारक..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!