Tuesday, June 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसचिन तेंडुलकरनंतर विराट कोहली देशातील दुसरा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू .. - आंतरराष्ट्रीय...

सचिन तेंडुलकरनंतर विराट कोहली देशातील दुसरा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू .. – आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-एक दिवसीय क्रिकेट सामना असो कीट्वेंटी-ट्वेंटी वा कसोटी क्रिकेट सामना असो,यात ज्याच्या नावातच विराट म्हणजेच अफाट,अपार असे सामर्थ्य दडलेले आहे; असा क्रिकेटपटू विराट कोहली  याने १४ वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीचा शेवट केला असून त्याने ११ मे च्या रात्री कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.मात्र, एकदिवसीय क्रिकेट खेळत राहील.
क्रिकेट विक्रमांव्यतिरिक्त श्रीमंत खेळाडूंच्या यादीत👇
जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला विराट कोहली क्रिकेट विक्रमांव्यतिरिक्त,जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या यादीत देखील गणला जातो. सचिन तेंडुलकरनंतर तो देशातील दुसरा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे.
सर्वाधिक कर भरणारा खेळाडू👇
२०२४ मध्ये,कोहली भारतातील सर्वाधिक कर भरणारा खेळाडू होता.या वर्षी त्याने सरकारला ६६ कोटी रुपयांचा कर भरला.याशिवाय,कोहलीचे नाव जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप शंभर खेळाडूंच्या यादीत देखील समाविष्ट आहे.
कोट्यवधीचा धनी👇
 
२०२५ मध्ये विराट कोहलीची एकूण संपत्ती सुमारे ₹१,०५० कोटी असण्याचा अंदाज आहे.यामध्ये बीसीसीआयकडून मिळणारे क्रिकेट पगार,ब्रँड एंडोर्समेंट आणि त्याचे स्वतःचे व्यवसाय यांचा समावेश आहे.बीसीसीआयसोबतच्या ए+ ग्रेड करारानुसार, कोहलीला वार्षिक ७ कोटी रुपये पगार आणि स्वतंत्र सामना शुल्क मिळते.कोहली २० ब्रँड्स एंडोर्स करतो.यामुळे त्याचे वार्षिक उत्पन्न सुमारे २०० कोटी रुपये आहे.कोहलीची WROGN,Chisel Fitness,One8 आणि Digit Insurance मध्ये गुंतवणूक आहे.यातून अंदाजे ४० कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळते.कोहलीकडे हरियाणातील गुरुग्राममध्ये ८० कोटी रुपयांचा आलिशान बंगला आहे.हे घर गुरुग्राममधील डीएलएफ सिटी फेज-१ च्या ब्लॉक-सी मध्ये आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार,हे घर ४५०० चौरस फूट जागेत बांधले आहे.विराटच्या या घरात वेगळा स्विमिंग पूल,जिम इत्यादी सुविधा आहेत.याशिवाय, कोहलीचे मुंबईतील वरळी येथे एक अपार्टमेंट देखील आहे.हे आलिशान घर ओंकार १९७३ अपार्टमेंटच्या ३५ व्या मजल्यावर आहे,जे ७,१७१ चौरस फूट क्षेत्रात पसरलेले आहे.विराट आणि अनुष्काने हे घर २०१६ मध्ये खरेदी केले होते.या घराची किंमत अंदाजे ३४ कोटी रुपये आहे.या घरात फोटोशूट आणि जाहिरातींसाठीही जागा आहे. विराटच्या कसरतसाठी सर्व सुविधांनी सुसज्ज एक जिम देखील आहे.याशिवाय,कोहलीकडे महाराष्ट्रातील अलिबागमध्ये सुमारे १३ कोटी रुपये किंमतीचे ३,३५० चौरस मीटरचे सुट्टीचे घर आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसविण्याची शेवटची तारीख; उद्यापासून हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त :-जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट(एचएसआरपी) बसविण्याची अंतिम मुदत आज,मंगळवार ३० जून रोजी संपत असून,त्यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार...

भव्य प्रवेशोत्सवातून शिक्षणाचा नवा अध्याय.. – महात्मा गांधी नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर वार्ड देसाईगंज येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आयएसओ मानांकन प्राप्त महात्मा गांधी नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा, नैनपूर वार्ड,देसाईगंज येथे आज,मंगळवार ३० जून रोजी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या दिवसानिमित्त प्रवेशोत्सव...

साहित्यिक व कलावंतांना दरमहा ५ हजार मानधन; ऑनलाइन अर्जासह ऑफलाइन प्रस्ताव सादर करणे बंधनकारक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या 'राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना' अंतर्गत कला व साहित्य क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या...

उद्यापासून ८ लाख २८ हजार ९०४ मतदारांची होणार पडताळणी; बीएलओंकडून घरोघरी सर्वेक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यात "मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६" प्रभावी व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत आहे.या कार्यक्रमाच्या अंमलबजावणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!