Friday, September 4, 2026
Homeचंद्रपूरट्रॅक्टरच्या समोरच मारली उडी अन् धावला मागे.. - चालकासह मजुराची उडाली भंबेरी..

ट्रॅक्टरच्या समोरच मारली उडी अन् धावला मागे.. – चालकासह मजुराची उडाली भंबेरी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-शेतातील कापूस आणण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन रस्त्याने जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या समोरच चक्क वाघाने उडी मारून काही अंतरापर्यंत पाठलाग केल्याने ट्रॅक्टर चालकासह मजुराची भंबेरी उडून काहीकाळ बोबडी वळल्याची खळबळ जनक घटना काल,शनिवारी
चिमूर तालुक्याच्या नेरी-शिरपूर मार्गावरील शिरपूर टेकडी परिसरात घडली.सदरचा चित्तथरारक प्रसंग ट्रॅक्टर चालक मिथुन मेश्राम व मजूर बाळू वैरागडे यांच्या बाबतीत घडला.
अधिक माहिती अशी की,चंद्रपूर जिल्ह्याच्या काही  गावांमध्ये सध्याच्या घडीला कापूस वेचणी तथा कापूस काढणीचे काम सुरू आहे.अशातच चिमूर तालुक्याच्या शिरपूर येथील शेतकरी टिकाराम पिसे यांच्या शेतातून ३१ जानेवारीला कापूस काढणे सुरू होते.कापूस काढणीसाठी महिला शेतमजूर कामावर असतांना शेत शिवारातील भागात वाघाने डरकाळी फोडली.त्यामुळे महिला मजुरांची घाबरगुंडी उडाली.कापूस काढता-काढता महिला मजुरांनी शेतातून काढता पाय घेतला आणि घरी परतल्या.वाघाच्या डरकाळीमुळे शेतातील कापूस तसेच पडून राहिल्याने शेतकरी टिकाराम पिसे यांनी ट्रॅक्टर चालक मिथुन मेश्राम व मजूर बाळू वैरागडे यांना शेतातील कापूस आणण्यासाठी काल शनिवारी ट्रॅक्टर घेऊन जाण्यास सांगितले.त्यानुसार शेताकडे जात असतांना वाघाने शिरपूर टेकडी परिसरात ट्रॅक्टर समोरच अचानकपणे उडी मारली.वाघाने उडी मारतच चालकाने प्रसंगावधान साधून ट्रॅक्टर सुसाट वेगाने पळवला आणि आरडाओरड केली.तरीही वाघाने काही अंतरापर्यंत पाठलाग केला.चित्तथरारक घटनेने दोघांचीही काहीकाळ भंबेरी उडाली.त्यातच ओरड सुरू असतांना वाघाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकल्याने दोघांनीही सुटकेचा निःश्वास सोडला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!