Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीवन्य प्राण्याची शिकार करणे पडले महागात.. - ११ जण ताब्यात; दोन दिवसांची...

वन्य प्राण्याची शिकार करणे पडले महागात.. – ११ जण ताब्यात; दोन दिवसांची वन कोठडी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली जिल्हा जंगलव्याप्त जिल्हा असल्याने बऱ्याच तालुक्यातील जंगल परिसरात वन्यप्राणी आढळून येतात.कुठे वाघ,बिबट्या,हरीण, जंगली हत्ती,बारा शिंग्या,जंगली डुक्कर,निलगाय सह विविध प्राणी जंगलात वा रस्ता ओलांडताना दिसून येतात.अशातच जंगलव्याप्त परिसरात वास्तव्यास असणाऱ्या आदिवासी बांधव वा परिसरातील नागरिकांकडून शिकार करून मांस खाण्याचे प्रमाण निदर्शनास येऊ लागले आहे.असाच प्रकार गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यात उघडकीस आला आहे.सुरुवातीला जंगल परिसरात विद्युत प्रवाह सोडून नीलगायीची शिकार केली.शिकार होताच तिचे मांस वाटप केले.अशातच मांस शिजवीत असतांना वन विभागाने धाड टाकून १२ जणांवर गुन्हा दाखल करून ११ जण ताब्यात घेत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची वन कोठडी सुनावली आहे.
सविस्तर वृत्त असे की,चामोर्शी तालुक्याच्या कुनघाडा रै अंतर्गत येणाऱ्या गिलगाव जमी जंगल परिसरात विद्युत प्रवाह लावून नीलगायीची शिकार करण्यात आली असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एम.ए.तावाडे, वनरक्षक आर.एस.बागडे यांना मिळाली.त्यानुसार गिलगाव जमी येथील अजय परशुराम मंटकवारच्या घरी छापा टाकला.अजय परशुराम मंटकवारच्या घरी छापा टाकताच सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.त्यामुळे घरातील झडती घेताच एका भांड्यात गीलगायीचे मांस शिजवलेले आढळले आणि भांडाफोड झाला.त्यानुसार इतरांच्या घरांची झडती घेताच तब्बल १२ जणांच्या घरी नीलगायीचे मांस शिजतांना आढळून आले.१२ पैकी ११ जणांना ताब्यात घेत वन्यप्राणी संरक्षक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.११ आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची वन कोठडी सुनावली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!