Saturday, May 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तयोगगुरू रामदेव बाबाच्या अडचणीत वाढ; अजामीनपात्र वॉरंट जारी...

योगगुरू रामदेव बाबाच्या अडचणीत वाढ; अजामीनपात्र वॉरंट जारी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-योगगुरू रामदेव बाबाच्या अडचणीत वाढ झाल्याचे समोर आले आहे.अगोदरच विविध न्यायालयात पतंजलीच्या विरोधात खटले सुरू असतांनाच आणखी एका खटल्यात आक्षेपार्ह जाहिरात प्रसिद्ध केल्या प्रकरणी केरळच्या पलक्कड जिल्हा न्यायालयाने रामदेव बाबासह पतंजली योगपीठाचे अध्यक्ष आचार्य बाळकृष्ण यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.योगगुरू बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड यांच्याविरुद्ध अनेक खटले दाखल आहेत.यामध्ये दिशाभूल करणाऱ्या जाहिराती,ट्रेडमार्क उल्लंघन यासारख्या प्रकरणांचा समावेश आहे.या प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि पतंजलीला दिलासा दिला असला तरी,पुन्हा न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केले तर शिक्षा होऊ शकते,अशी ताकीद न्यायालयाने दिली होती.त्यानंतर आता त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी झाले आहे.केरळच्या ड्रग्ज इन्स्पेक्टरने दिव्या फार्मसीविरुद्ध दाखल केलेल्या फौजदारी खटल्याच्या सुनावणीला गैरहजर राहिल्याने न्यायालयाने दोघांनाही १५ फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याबाबत अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!