Friday, September 4, 2026
Homeचंद्रपूरवनपरिक्षेत्र अधिकाऱ्यास शिवीगाळ करणाऱ्या आरोपीस अनोखी शिक्षा..

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यास शिवीगाळ करणाऱ्या आरोपीस अनोखी शिक्षा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुका मुख्यालयापासून २० किलोमिटर अंतरावर असलेल्या निंबाळा गावातील गैर आदिवासींचे अतिक्रमण हटविण्याबाबत कारवाईसाठी गेलेल्या महिला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यास शिवीगाळ व चालकास धक्काबुक्की केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालय चंद्रपूरचे न्यायधीश शेख यांनी आरोपीस एक अनोखी व आगळी-वेगळी शिक्षा सूनावल्याने जिल्ह्यात एकच चर्चेचा विषय ठरला आहे.गणपत रघुनाथ नैताम वय ३१ वर्षे असे सजा सुनावलेल्या आरोपीचे नाव असून प्रकरणी तीन हजार रुपयांचे दंड आणि कोर्टाची सुट्टी होईपर्यंत न्यायालयात हजर राहावे,अशी सजा सुनावली आहे.
अधिक प्रकरण असे की,निंबाळा येथील गैर आदिवासींचे अतिक्रमण हटविण्याबाबत तसेच पात्र अपात्र वनहक्क दावे याबाबत निंबाळाच्या तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती महेशकर यांनी २०२२ मध्ये बैठक घेतली होती.यावेळी अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेतला.१ फेब्रुवारी २०२२ रोजी वन विभागाचे अधिकारी अतिक्रमण हटवण्यासाठी गेले असता गणपत नैताम याने अटकाव करीत काठी घेऊन वनाधिकाऱ्यांच्या अंगावर गेला व धक्काबुक्की केली,अशी तक्रार होती.निंबाळाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती महेशकर यांनी रामनगर ठाण्यात सन २०२२ रोजी अतिक्रमण काढतांना गणपत नैतान याने शासकीय कामात अडथळा आणल्याची तसेच शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याची तक्रार दिली होती.पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध प्रबळ पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपत्र सादर केले होते.त्यानुसार सदर प्रकरणाचा नुकताच आगळा- वेगळा व अनोखा निकाल लागल्याने चर्चेचा विषय ठरू लागला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!