- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरापासून दीड किलोमिटर अंतरावर आरमोरी मार्गे नैनपुर फाट्या नजिक ट्रक आणि दोन दुचाकींचा अपघात होऊन एकजण ठार तर दोघे बापलेक गंभीर जखमी झाल्याची घटना काल,सोमवार १६ जूनच्या रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.अपघातात देसाईगंज तालुक्याच्या कुरुड येथील ३७ वर्षीय महेश वासनिक याचा मृत्यू झाला.तर गडचिरोली तालुक्याच्या पोर्ला येथील ६६ वर्षीय किशोर कोचे व ३५ वर्षीय सुनील कोचे हे बापलेक गंभीर जखमी झाल्याने दोघांनाही देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचाराकरिता हलविण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार,महेश वासनिक हा काल सोमवारच्या रात्री स्वतःच्या दुचाकीने एकटाच देसाईगंजवरून आपल्या स्वगावी कुरुड येथे जात होता.शहरापासून दीड किलोमिटर अंतरावर येताच भरधाव वेगाने देसाईगंजला जाणाऱ्या ट्रकने नैनपुर फाट्या नजिक त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.त्याचवेळेस किशोर कोचे व सुनील कोचे हे त्यांच्या दुचाकीने महेश वासनिकच्या मागे असल्याने त्यांचे वाहन अनियंत्रित होऊन एकमेकांना आपटले. यात दोन्ही दुचाकींचा अपघात होऊन तिघेही मुख्य डांबरी मार्गावर कोसळले.देसाईगंज-आरमोरी मार्ग हा रहदारीचा असल्याने मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी अपघातस्थळी कार थांबवून तिघांनाही देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले.अश्यातच महेश वासनिक यास जबर मार लागल्याने त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला.तर पोर्ला येथील बापलेक गंभीर जखमी झाल्याने दोघांनाही रात्रीच पुढील उपचाराकरिता गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.घटनेबाबत देसाईगंज पोलीस ठाण्यात विचारणा केली असता प्रथम खबरी अहवाल(FIR)दाखल झाल्याशिवाय कुठलीही माहिती देता येणार नसल्याचे सांगण्यात आले.हे विशेष.
- Advertisement -

