Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरदोन टक्के कमिशन द्या; स्थानिक बातमीदारांना सांभाळून घेऊ..! - तालुका पत्रकार संघाने...

दोन टक्के कमिशन द्या; स्थानिक बातमीदारांना सांभाळून घेऊ..! – तालुका पत्रकार संघाने सरपंचाची पोलीस ठाण्यात केली तक्रार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यात आश्चर्यकारक तितकीच धक्कादायक बाब सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका सरपंचाच्या संभाषणातील ऑडिओ क्लिपने उघडकीस आली आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींचे बांधकाम सुरू असतांना मातीमिश्रित काळ्या रेतीचा त्यात वापर होत असल्याने सदर बांधकाम योग्य नाही म्हणून तक्रारींपासून बचाव करायचा असेल तर दोन टक्के कमिशन द्या,आमच्या नेत्यांना भेटून घ्या,यात आम्ही स्थानिक बातमीदारांना (पत्रकारांना) सांभाळून घेऊ,असे व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये चक्क सरपंच बतावणी करीत असल्याने स्थानिक पत्रकारांची समाजातील प्रतिमा मलिन केल्याने नरखेड तालुका पत्रकार संघाने याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
नरखेड तालुक्यातील जलालखेडा व मोवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींचे बांधकाम सुरू आहे.या दोन्ही इमारतींच्या बांधकामाचे कंत्राट दिल्ली येथील दीपाली कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आहेत.या बांधकामांसाठी १ कोटी ४३ लाख रुपये मंजूर झाले आहेत.या बांधकामात मातीमिश्रित काळ्या मातीचा वापर केला जात असल्याची माहिती नागरिकांनी सरपंच कैलास निकोसे यांना दिली.त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्याला फोन करून दोन टक्के कमिशनची मागणी केली व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या मोठ्या नेत्यांना भेटून घ्या,ते गृहमंत्र्यांच्या जवळचे आहेत,यासह इतर बाबींचा उल्लेख क्लिपमध्ये केला. त्यांनी संभाषणात वृत्तपत्रांच्या स्थानिक बातमीदारांचा उल्लेख केल्याने नरखेड तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणेदार तुषार चव्हाण यांच्याकडे तक्रार देऊन चौकशी व कारवाईची मागणी केली आहे.
  • कैलास निकोसे,सरपंच जलालखेडा👇
मी अशा प्रकारचे कुठलेही विधान केलेले नाही.मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.माझे नाव सांगून विरोधक हे काम करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!