Saturday, September 12, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' वर आधारित बनणार चित्रपट.. - प्रसिद्ध नृत्यांगणा...

आता ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ वर आधारित बनणार चित्रपट.. – प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील दिसणार मुख्य भूमिकेत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका विधानसभा निवडणुकीत भरून काढण्यासाठी व राज्याच्या राजकारणात गेमचेंजर ठरलेली  ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.योजनेवर आधारित येत्या पुढील काळात चित्रपट तयार होणार असून नुकतेच सातारा येथे या चित्रपटाचा शुभारंभ मोठ्या दिमाखात पार पडला.यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मुहूर्त देत प्रकल्पाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या.सोबतच स्थानिक आमदार आणि जिल्हाधिकारी यांची उपस्थिती होती.’लाडकी बहीण’ चित्रपट केवळ मनोरंजन नाही,तर समाजप्रबोधनाचा एक प्रभावी प्रयत्न आहे.महाराष्ट्रातील महिलांसाठी चालू असलेल्या या योजनेला प्रोत्साहन देणारा आणि त्यामागचा उद्देश जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारा हा सिनेमा भविष्यातील अनेक चित्रपटांना प्रेरणा देणारा ठरणार आहे.विशेष म्हणजे,तरुणांच्या दिलावर राज करणारी प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील आणि अभिनयाच्या जोरावर घराघरात पोहोचलेले ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अण्णा नाईक ही जोडी प्रथमच चित्रपटात दिसणार आहे.चित्रपटाची कहाणी केवळ एका योजनेभोवती फिरणारी नाही,तर ती त्या योजनेमुळे बदललेले आयुष्य,महिला सक्षमीकरणाचा प्रवास आणि ग्रामीण भागातील वास्तव याचे वास्तवदर्शी चित्रण करणारी आहे.चित्रपटात गौतमी पाटील एका संघर्षमय जीवन जगणाऱ्या महिलेची भूमिका साकारणार आहे.जी या योजनेच्या माध्यमातून आपले आयुष्य उभे करते. तिच्या आयुष्यात येणारे अडथळे,समाजाचा दृष्टिकोन आणि  त्यावर मिळवलेला विजय हे सर्व प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारे असणार आहे.तर अण्णा नाईक या कथेला बळ देणारी भूमिका साकारणार आहेत,ज्यामध्ये ते एका संवेदनशील आणि समाजाभिमुख व्यक्तीमत्वाची झलक दाखवतील. सदर चित्रपटाचे दिग्दर्शन गणेश शिंदे करणार असून, जे सामाजिक विषयांवर प्रभावी मांडणीसाठी ओळखले जातात.ओम साई सिने फिल्म आणि शुभम फिल्म प्रोडक्शन या बॅनरखाली हा चित्रपट तयार होत असून,शितल गणेश शिंदे,बाबासाहेब पाटील आणि अनिल वणवे हे निर्माते आहेत.पटकथा आणि संवाद लेखन शितल शिंदे यांनी केले असून,चित्रपट वास्तव आणि भावना यांचा समतोल राखणारा असणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!