Friday, May 1, 2026
Homeचंद्रपूरजुनी पेन्शनसाठी कर्मचाऱ्याने चक्क राष्ट्रपतींकडे फाशीच्या मागणीचा केला अर्ज......

जुनी पेन्शनसाठी कर्मचाऱ्याने चक्क राष्ट्रपतींकडे फाशीच्या मागणीचा केला अर्ज……

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- बहुतांशवेळा आपण बघत असतो की तुरुंगातील कैदी किंवा सजा झालेले व्यक्ती राष्ट्रपतींकडे फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी विनंती अर्ज करीत असतात.अर्जानंतर अनेकवेळा त्यांची शिक्षा कमी होते किंवा स्थगितही होत असल्याचे आपण बघतो.मात्र चंद्रपुरातील एका चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याने प्रशासन आणि राज्यकर्त्यांच्या कारभाराला कंटाळून चक्क राष्ट्रपतींकडेच मरेपर्यंत फाशी मिळण्याबाबत अर्ज केला आहे.आश्चर्य वाटेल, मात्र हे खरे आहे.आपल्यासोबत असलेल्या सर्व सहकारी कर्मचाऱ्यांना शासनाने शासन सेवेत सामावून घेतले एवढेच नाही तर त्यांना पेन्शनही लागू केली आहे. मात्र आपल्यालाच यातून सोडून दिल्याने त्यांनी थेट राष्ट्रपतींकडे ही मागणी केली आहे.

जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये सन २००० पासून चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून छगन आ.खनके हे मानधनावर कार्यरत होते. दरम्यान, २७ फेब्रुवारी २००६ रोजी शासन आदेशान्वये नियमित करण्यात आले.मात्र २००५ मध्ये शासनाने जुनी पेन्शन योजना बंद केल्याने यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनमधून वगळण्यात आले होते. कर्मचाऱ्यांनी सातत्याने लढा दिल्यानंतर शासनाने राज्यभरातील ३० कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू केली. मात्र आरोग्य विभागात कार्यरत छगन खनके यांना यातून वगळण्यात आले आहे.आपल्यासह राज्यभरातील अन्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन तर मग आपल्याला का नाही म्हणून त्यांनी शासन,प्रशासनासोबत वारंवार पत्रव्यवहार केला.मात्र त्यांच्या मागणीची कुणीही दखल घेतली नाही. केवळ आश्वासनावरच वेळ मारून नेली जात आहे.यानंतर खनके यांचा संयम सुटला आहे.आपल्याला जुनी पेन्शन योजना सुरू करावी; या मागणीला घेऊन त्यांनी जिल्हा प्रशासन ते थेट मंत्रालय,मुख्यमंत्र्यांपर्यंत वारंवार निवेदन,पत्रव्यवहार केला आहे.मात्र अजूनपर्यंत तरी काहीच उपयोग झाला नाही.त्यामुळे आता त्यांनी राष्ट्रपतींना एक पत्र लिहिले असून,पत्रामध्ये जुनी पेन्शन योजना लागू झाली नसून आपल्याला न्याय मिळाला नसल्याने मरेपर्यंत फाशी द्यावी; अशी मागणी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!