Sunday, July 26, 2026
Homeदेसाईगंजकुरुड जिल्हा परिषद हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक वकील शेख यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार.....

कुरुड जिल्हा परिषद हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक वकील शेख यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त देसाईगंज :- जिल्हा परिषद हायस्कूल कुरुड येथील मुख्याध्यापक वकील शेख यांना यावर्षीचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्राप्त झालेला आहे.जय हिंद सेवाभावी सामाजिक संस्था परभणी व्दारा दर वर्षी  विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व कर्तृत्व गाजविणाऱ्या व्यक्तींचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतो. यावर्षी महाराष्ट्रातील २२ व्यक्तींना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.वर्धेचे खासदार रामदास तडस आणि पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अरुण चौधरी यांच्या हस्ते,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी,माजी पोलीस उपायुक्त चंद्रकांत उदगीरकर,जय हिंद सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अब्दुल सत्तार इनामदार,सुप्रसिद्ध कवी गझलकार सूत्रसंचालक इमरान राही यांच्या प्रमुख उपस्थितीत वकील शेख यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.सदर पुरस्कार सोहळा राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वर्धा नगरीत संपन्न झाला.वकील शेख यांना या पूर्वी महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार,मानव संसाधन मंत्रालय भारत सरकारचा युवा पुरस्कार सह अनेक पुरस्कार प्राप्त झालेले असून महाराष्ट्रातील अनेक सामाजिक, साहित्यिक,शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा संबंध असुन,मुंबई दूरदर्शन,आकाशवाणी नागपूर वरून त्यांच्या कविता प्रसारित झालेल्या आहेत.त्यांना मिळालेल्या पुरस्कार बद्दल मो.आरीफ शेख मुख्याध्यापक रफी अहमद किदवाई प्राथमिक सेमी इंग्लिश स्कूल देसाईगंज यांनी व अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! लहान भावाच्या उपस्थितच १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून...

शेतकरी कर्जमाफी योजना; गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ५३९ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर २५ जुलै २०२६ रोजी...

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

अखेर विद्यार्थी आंदोलनाचा मोठा विजय; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा.

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून राजधानीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आज...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!