Monday, July 13, 2026
Homeचंद्रपूरजिल्हाधिकारी कार्यालयात महिलेशी अरेरावी; कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस.. - व्हायरल व्हिडिओची...

जिल्हाधिकारी कार्यालयात महिलेशी अरेरावी; कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस.. – व्हायरल व्हिडिओची दखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-काही दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय कामानिमित्त गेलेल्या एका सर्वसामान्य महिलेशी तेथील कर्मचाऱ्याने अरेरावीची भाषा वापरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच प्रशासनाने दखल घेत शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांशी सन्मानपूर्वक व संयमाने वागणे ही प्रत्येक शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्याची मूलभूत जबाबदारी आहे.त्यामुळे कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन अथवा अरेरावीची भाषा खपवून घेतली जाणार नाही; असे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष बैठक बोलावून नागरिकांशी संवाद साधतांना शिष्टाचार,संवेदनशीलता व प्रशासनाची प्रतिमा जपण्याबाबत सूचना देत प्रकरणाशिसंबंधित  कर्मचाऱ्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले असून प्राप्त खुलाशानुसार पुढील प्रशासकीय अथवा कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतला जाणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी म्हटले आहे.
  • व्हायरल व्हिडिओ(सोर्स सोशल मीडिया)👇
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!