Wednesday, July 29, 2026
Homeआरमोरीचार्जरसाठी युवतीला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या दोघांना गडचिरोली पोलिसांनी केली अटक... -पोलीस कोठडीत...

चार्जरसाठी युवतीला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या दोघांना गडचिरोली पोलिसांनी केली अटक… -पोलीस कोठडीत रवानगी; आरमोरी शहरातील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली) :-आरमोरी शहरातील आरमोरी-वडसा टी पॉइंट मुख्य रस्त्यालगत शिवम कॅफे रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या १९ वर्षीय युवतीने मोबाईल चार्जर दिला नाही म्हणून तिला युवकांनी बेदम मारहाण केल्याची घटना १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान घडली असल्याचा  प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. युवतीच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.सोहेल शेख वय ३० वर्षे रा.बर्डी वॉर्ड, आरमोरी व अयुब शेख ३८ वर्षे रा.कासार मोहल्ला, आरमोरी अशी आरोपींची नावे आहेत.
आरमोरी येथील आरमोरी-वडसा टी पॉइंट मुख्य रस्त्यालगत शिवम कॅफे रेस्टॉरंट आहे.मागील नऊ महिन्यांपासून १९ वर्षीय युवती हॉटेलमध्ये काम करीत आहे.स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आरोपी सोहेल व त्याची पत्नी रेस्टॉरंटमध्ये दोसा खाण्यासाठी आले. सोहेल याने पत्नीला रेस्टॉरंटमध्ये सोडून तो बाहेर कामासाठी निघून गेल्यानंतर सोहेलच्या पत्नीने युवतीस मोबाईल चार्जर मागितला.मालकाचा आदेश असल्याने मी तुम्हाला चार्जर देऊ शकत नाही; असे उत्तर युवतीने दिले.यानंतर सोहेलच्या पत्नीने तिच्याशी बाचाबाची करीत घटनेची माहिती तिने सोहेलला दिली.अवघ्या पाच मिनिटात आरोपी सोहेल हा रेस्टॉरंटमध्ये पोहोचला.काउंटरवर बसलेल्या युवतीचे केस धरून टेबलवर तिचे जोरजोराने डोके आपटले. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.सोहेलने फोन करून काही युवकांना बोलावून घेतले.यापैकी आरोपी अयुब शेखने युवतीला मारहाण केली; असे युवतीने तक्रारीत म्हटले आहे.
युवतीच्या तक्रारीवरून आरमोरी पोलिसांनी सोहेल शेख व अयुब शेख यांच्याविरोधात विनयभंग, लज्जास्पद वर्तणूक,अश्लील शिवीगाळ,जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल केला.
सोहेल व त्याचा मित्र अयुब हेच खरे आरोपी असल्याचे सीसीटीव्हीवरून पोलिसांच्या लक्षात आले. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.मात्र, अटक कधी होणार,असा प्रश्न उपस्थित केला जात होता.त्यानुसार गुन्ह्यातील आरोपी सोहेल मेहमूद शेख व अब्दुल अयुब नासिर शेख हे फरार झाले होते. गडचिरोली पोलिस दलाने सदर दोन्ही फरार आरोपींचा शोध घेऊन आज,दिनांक-१९ ऑगस्टला सकाळच्या सुमारास अटक केली.अटकेनंतर दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!