Tuesday, September 22, 2026
Homeनवी दिल्लीमहाराष्ट्रातील आगामी विधानसभेच्या निवडणुका २६ नोव्हेंबरपूर्वीच.

महाराष्ट्रातील आगामी विधानसभेच्या निवडणुका २६ नोव्हेंबरपूर्वीच.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नवी दिल्ली :-महाराष्ट्रातील आगामी विधानसभेच्या निवडणुका विधानसभेची मुदत संपण्याआधीच होणार आहेत.२६ नोव्हेंबरपूर्वी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल.ऑक्टोंबरमध्ये निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.याचे कारण म्हणजे,महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याचा निवडणूक आयोगाचा कोणताही विचार सध्यातरी नाही.असे  केंद्रीय निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.
निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,महाराष्ट्र विधानसभेच्या विद्यमान सरकारचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपत आहे.त्याआधी महाराष्ट्रात निवडणुका होणार आहेत.वेळेत निवडणूका घेणे,ही घटनात्मक सक्ती असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.यामध्ये कोणतेही बदल करता येणार नाहीत.वास्तविक २६ नोव्हेंबरपर्यंत निवडणुका न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल.निवडणूक आयोगाने अशी परिस्थिती निर्माण होऊ देण्यास स्पष्ट नकार दिला.निवडणूक आयोगाच्या नकारामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये पूर्ण होतील आणि नवे सरकारही निर्धारित वेळेत स्थापन होईल; असे स्पष्ट झाले आहे.
निवडणूक आयोगाने १६ ऑगस्ट रोजी,हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभांच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली होती.यावेळी आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली नाही. हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ ३ नोव्हेंबरला संपत आहे.महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपत आहे.अशा स्थितीत महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका जम्मू- काश्मीर आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुका सोबतच जाहीर होणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता.मात्र,निवडणूक आयोगाने तसे न करता केवळ हरियाणा आणि जम्मू-काश्मीर निवडणुकांची घोषणा केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!