Tuesday, September 15, 2026
Homeनवी दिल्लीमोठी बातमी,चारचाकी वाहन,ट्रॅक्टर व इतर कारणांमुळे रॉशन कार्ड होणार रद्द- रॉशन कार्ड...

मोठी बातमी,चारचाकी वाहन,ट्रॅक्टर व इतर कारणांमुळे रॉशन कार्ड होणार रद्द- रॉशन कार्ड रद्द तर होणार सोबतच कारवाई होणार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नवी दिल्ली :- सध्या स्थितीत सगळीकडेच मोफत रॉशन दिले जात आहे.अशातच मोफत रॉशन मिळण्यासाठी अपात्र असणारेही लाभ घेत असल्याने सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.यासाठी रॉशन कार्डधारकाने स्वत:च्या उत्पन्नातून १०० वर्गमीटरचा प्लॉट,फ्लॅट किंवा घर खरेदी केली असेल,त्याच्याकडे चार चाकी वाहन,ट्रॅक्टर, शस्त्राचे लायसन्स,गावात वर्षाला दोन लाख आणि शहरात तीन लाखाहून अधिक पगार असेल अशा लोकांना त्यांचे रॉशनकार्ड तहसील किंवा डीएसओ कार्यालयात जमा करावे लागणार आहे.वरील चार गोष्टींपैकी एका जरी गोष्टीत दोषी आढळल्यास रॉशन कार्डधारकाचे रॉशनकार्ड तर रद्द होईलच पण त्याच्यावर कारवाईही केली जाणार आहे.

नव्या सरकारी नियमानुसार जर रॉशन कार्डधारकाने स्वत:हून कार्ड रद्द वा जमा केले नाही तर चौकशीनंतर असे कार्ड रद्द केले जाणार आहे.तसेच अशा कुटुंबीयांविरोधात कायदेशीर कारवाईही होऊ शकते. एवढेच नाही तर जेव्हापासून रॉशन उचलल्या गेले असेल,तेव्हापासूनची त्यांच्याकडून भरपाईही केली जाणार आहे.

खरे म्हणजे रॉशन दुकानांतून दिले जाणारे रॉशन आर्थिकदृष्ट्या दुर्बल,कमकुवत व सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे.मात्र हल्ली ज्यांची आर्थिक बाजू भरभक्कम आहे; असेही शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन शासनाची दिशाभूल करतांना दिसून येतात.त्यासाठी गोरगरिबांना लाभ व्हावा; या उद्देशाने शासनातर्फे सदर निर्णय घेण्यात आला असल्याचे दिसून येते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सामाजिक,सहकार व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा संकल्प फाउंडेशनतर्फे गौरव..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या गेवर्धा येथे आज,सोमवार १४ सप्टेंबर रोजी संकल्प फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे सामाजिक,सहकार व शैक्षणिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गावातील तीन...

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-परंपरेचे जतन आणि पर्यावरणाचे संरक्षण यांचा समतोल साधणे ही सामूहिक जबाबदारी आहे. गणेशोत्सवाचा आनंद घेतांना पर्यावरणाची हानी होणार नाही,याची काळजी घेणे...

अतिवृष्टीग्रस्त कुटुंबीयांना १ लाख ३० हजाराची आर्थिक मदत वितरित.. -भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांच्या पाठपुराव्याला यश..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-अतिवृष्टीमुळे घर कोसळून नुकसान झालेले कुरखेडा शहराच्या गांधी वार्डातील ज्येष्ठ नागरिक नरेश हडप यांच्या कुटुंबाला प्रशासनाकडून १ लाख ३० हजारांची आर्थिक मदत...

अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळाचा मृत्यू; तर कुंपणात अडकून बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन वन्य प्राण्यांचा मृत्यू झाल्याने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील तावशी संभाजीनगर महामार्गावर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!