Thursday, April 30, 2026
Homeनवी दिल्लीआयएएस अधिकारी सेवेतून बडतर्फ पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन मंजूर..

आयएएस अधिकारी सेवेतून बडतर्फ पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन मंजूर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नवी दिल्ली :-आयएएस अधिकारी सेवेतून बडतर्फ पूजा खेडकरला अखेर आज,बुधवार २१ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.पूजा खेडकर ही आयएएस अधिकारी होती.मात्र,तिने केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
पूजा खेडकर प्रकरण👇
 
पूजा खेडकरने अपंगत्व दाखवण्यासाठी दोन प्रमाणपत्रे सादर केली.तपासणीत त्यातील एक प्रमाणपत्र बनावट असल्याचे दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयाला सांगितले होते.इतर मागासवर्गीय आणि अपंगत्व कोट्याचे लाभ फसवणूक आणि चुकीच्या पद्धतीने मिळविल्याचा आरोप खेडकरवर आहे.पूजा खेडकरने खोटे वैद्यकीय दिव्यांग प्रमाणपत्र दिले, असा आरोप आहे.पूजा खेडकर हिने दिव्यांग प्रवर्गाचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले होते. युपीएससीला फसवण्यासाठी पूजा खेडकरने वारंवार नावे बदलली.केवळ पूजाच नाही,तर तिच्या आईवडिलांचीही नावे वारंवार बदलण्यात आली,असा आरोप आहे.पूजा खेडकरने फ्रॉड केला,कौटुंबिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त असतांनाही नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर केले; असाही आरोप तिच्यावर आहे.पूजा खेडकर हीचे आई वडील दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांनी घटस्फोट घेतल्याचे सांगितले गेले.पूजा खेडकरने निर्धारित संख्येपेक्षा अधिकवेळा युपीएससी(UPSC) परीक्षा दिली. आयएएस(IAS)यादीत येण्यासाठी अपंगत्वाची श्रेणी बदलली,असाही आरोप तिच्यावर आहे.पूजा खेडकरांनी अनेकवेळा परीक्षा दिली,जे युपीएससीच्या नियमात बसत नाही.पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पूजा खेडकर आणि तिच्या वडिलांनी अरेरावी केली.वरिष्ठ अधिकाऱ्याचे केबिन बेकायदेशीरपणे बळकावले,असा आरोप करण्यात आला होता
जमीन मंजूर करतांना सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?👇
पूजाने कोणता गंभीर गुन्हा केला आहे? ती ड्रग्ज माफिया किंवा अतिरेकी नाही,तिने हत्या केलेली नाही, ती एनडीपीएस कायद्यांतर्गत आरोपी नाही; अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करतांना केली.पूजावर जे आरोप आहेत,त्यांचा तपास करण्यासाठी एखादी व्यवस्था अर्थात सॉफ्टवेअर हवे. यामुळे निश्चित वेळेत तपास करुन पुढील कारवाई करता येईल.पूजाने आतापर्यंत सर्व काही गमावले आहे.पूजाला आता कुठेही नोकरी मिळणार नाही; असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बीव्ही नागरत्ना आणि सतीश चंद्र शर्मा म्हणाले.
अटकपूर्व जामिनाला तीव्र विरोध👇
नागरी सेवा परीक्षेत अपंगत्व आणि ओबीसी आरक्षणाचा गैरफायदा घेणे.आरक्षणाच्या तरतुदींचा गैरफायदा घेण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक करणारी माहिती सादर करणे; असे गंभीर आरोप पूजा खेडकरवर आहेत.या प्रकरणात सुरू असलेल्या तपासाला पूजाने सहकार्य केलेले नाही. ही करणे देत दिल्ली पोलिसांच्या वकिलाने पूजाच्या अटकपूर्व जामिनाला तीव्र विरोध केला.यावर बोलतांना प्रकरणातील तथ्ये आणि परिस्थिती लक्षात घेता,दिल्ली उच्च न्यायालयाने पूजाला जामीन मंजूर करायला हवा होता,असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकरला तपास कामात सहकार्य करण्याचे निर्देश दिले.जुलै २०२४ मध्ये खेडकरविरुद्ध बनावट कागदपत्रे, फसवणूक, आयटी कायद्याचे उल्लंघन आणि अपंगत्व कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदविण्यात आला आहे.बनावट कागदपत्रे तयार करण्याकरिता मदत करणाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी पूजाची काही काळ कोठडीत चौकशी आवश्यक आहे; असे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे.पण सर्वोच्च न्यायालयाने पूजाने हत्या केलेली नाही,अशी टिप्पणी करत तिला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!