Wednesday, August 5, 2026
Homeनवी दिल्लीआजच्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; पहा एका क्लिकवर..

आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; पहा एका क्लिकवर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नवी दिल्ली :-केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज,शनिवारी १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ संसदेत सादर केला.अर्थमंत्री म्हणून त्यांचा हा सलग आठवा अर्थसंकल्प आहे.अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पात वेगवेगळी उत्पादने आणि सेवा यांच्यावरील प्रत्यक्ष (डायरेक्ट) आणि अप्रत्यक्ष कर (इन-डायरेक्ट टॅक्स) मध्ये बदल करण्याची घोषणा केली.त्यामुळे काही उत्पादने स्वस्त होतील.तसेच नवीन करवाढीमुळे इतर उत्पादनांच्या किंमती वाढू शकतात.मुख्यत्वे कॅन्सर,ईव्ही या गोष्टींवरील कर कमी करण्यात आला आहे.अर्थसंकल्पीय भाषणाच्या सुरुवातीला अर्थमंत्री म्हणाल्या की, ‘आपण आर्थिक विकासाकडे वाटचाल करीत आहोत.हे बजेट देशाच्या आकांक्षा प्रतिबिंबित करते. ’ सीतारामन सलग आठव्यांदा सभागृहात अर्थसंकल्प सादर करीत आहेत,ज्यामध्ये त्यांनी यापूर्वी सहा पूर्ण आणि दोन अंतरिम अर्थसंकल्प सादर केले आहेत.अर्थमंत्र्यांनी असेही म्हटले की,आपण जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहोत.पंतप्रधान धनधान्य योजनेचा विस्तार केला जाईल.पीक विविधीकरणावर लक्ष केंद्रित केले जाईल.यामुळे कृषी उत्पादकता वाढेल,ज्याचा फायदा ७.५ कोटी शेतकऱ्यांना होईल.
सरकार डाळींमध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी तूर आणि मसूर डाळ उत्पन्न वाढीवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार.
१०० जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार पंतप्रधान धन धान्य कृषी योजना.
फळे आणि भाज्या उत्पादन वाढवण्याबरोबर पुरवठा साखळी सुधारण्यावर लक्ष केंद्रित.
कापूस उत्पादकतेसाठी ५ वर्षांचा आराखडा. मत्स्यपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना राबवणार
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साठी ५०० कोटी रुपये.
१२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही. गेल्या ४ वर्षांचे आयटी रिटर्न एकत्रितपणे दाखल करता येणार.
ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा ५०,००० रुपयांवरून १ लाख रुपये.
किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज मर्यादा ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये
लघु उद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड, पहिल्या वर्षी १० लाख कार्ड जारी केले जाणार
एमएसएमईसाठी कर्ज हमी कव्हर ५ कोटी रुपयांवरून १० कोटी रुपये करण्यात आले आहे; १.५ लाख कोटी रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध असेल.
स्टार्टअप्ससाठी कर्ज १० कोटी रुपयांवरून २० कोटी रुपये केले जाईल.हमी शुल्कातही कपात केली जाईल.
मेक इन इंडिया अंतर्गत खेळणी उद्योगासाठी एक विशेष योजना सुरू केली जाणार.
स्टार्टअप क्रेडिट गॅरंटी २० कोटी रुपयांपर्यंत वाढ तर लघु आणि मध्यम उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी १० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
कर्करोगाची औषधे स्वस्त होणार. कर्करोग आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी असलेल्या ३६ औषधांवरील कस्टम ड्युटी रद्द केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन केले जाणार.
आयआयटी पाटण्याचा विस्तार केला जाईल.
पुढील ५ वर्षांत वैद्यकीय शिक्षणात ७५ हजार जागा वाढवणार
३६ जीवनरक्षक औषधांवरील शुल्क कर पूर्णपणे रद्द. सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये कर्करोग डे केअर सेंटर बांधले जाणार.
कर्करोगाच्या उपचारांसाठी औषधे स्वस्त होतील. ६ जीवनरक्षक औषधांवरील कस्टम ड्युटी ५% पर्यंत कमी केली जाईल.
डिजिटल शिक्षण उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सर्व सरकारी माध्यमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान केली जाईल.
विमा क्षेत्रासाठी एफडीआय ७४% वरून १००% पर्यंत वाढवला जाईल.’ ही सुविधा अशा कंपन्यांसाठी असेल ज्या संपूर्ण प्रीमियम भारतात गुंतवतील.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..!अंतिम संस्काराची तयारी सुरू असतांनाच मृतक व्यक्तीने उघडले डोळे..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यात एक अचंभित करणारी घटना काल मंगळवारी उघडकीस आली.एका ४० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल...

ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या...

आता बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे जातवैधता प्रमाणपत्र तयार करणे पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-बरेचदा जातवैधता प्रमाणपत्र अर्थात कॉस्ट व्यालीडिटी सर्टिफिकेट बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनवून शासकीय योजनांचा लाभ मिळवणे,शासकीय नोकरी,अभियांत्रिकी प्रवेश व इतर...

महामार्गाच्या विस्तारासाठी सरकारने शेतकऱ्यांना भूमिहीन करू नये- विजय वडेट्टीवार

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा,गोंदिया,गडचिरोली आणि चंद्रपूरपर्यंत करण्यासाठी सुरू असलेल्या भूसंपादनात व सुपिक जमीन घेण्यासाठी प्रशासनाकडून बळजबरी केली जात असल्याचा आरोप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!