- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-गावात विकास कामे तर केली जातात मात्र,विकास कामांच्या नावाखाली भकास कामे करून आपलीच पोळी शेकण्याचा प्रकार सर्वत्र निदर्शनास येऊ लागला आहे.अनेकांना जनतेशी वा गावातील कामे चांगल्या प्रकारे व्हावेत,यांच्याशी कसलेही देणे-घेणे नसते तर केवळ आपले खिसे गरम कसे होणार,याकडे सर्वात जास्त लक्ष असते.त्यातच भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील महालगाव-मोरगाव येथील बांधकामाची चौकशी संदर्भात ग्रामपंचायतीतील तसेच नागरिक उपोषणावर बसल्यानंतर दखल तर घेण्यात आली,मात्र मोहाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांचा दुटप्पीपणाही दिसून आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
‘गावातील विकासाची कामे करता येईल,यासाठी तडजोड करता येईल,मी त्या पक्षाला बोलावतो’ असे मोहाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांनी चक्क तक्रारकर्त्यांना सांगितल्याने खारे पाणी गोडे कसे होऊ लागले अश्या चर्चांना उधाण आले आहे.
महालगाव-मोरगाव येथील दोन सिमेंट रस्त्याचे बांधकाम व एका सिमेंट नालीच्या बांधकाची तक्रार पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती.उपोषणावर बसल्यानंतरच तक्रारीची दखल घेण्यात आली होती.पाच दिवसांनी चौकशी अहवाल देण्यात येईल,या आश्वासनावर उपोषण सोडण्यात आले होते.
उपोषणाच्या आदल्या दिवशी ज्या व्यक्तींनी बांधकामात अनियमितता केली त्यांच्याशी तडजोड करता येईल,याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी व संबंधित अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता.मात्र त्याच दिवशी अहवाल मागितले गेले.महालगाव-मोरगाव येथील बांधकामाच्या तक्रारीच्या अहवाल तक्रारकर्त्यांना देण्यात आला.त्या अहवालात कोणत्याही प्रकारच्या जावक क्रमांक नाही. तसेच कोणत्या तारखेला अहवाल दिला याबाबत कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही.
दिनेश हरीणखेडे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती मोहाडी👇
त्या प्रकरणात मला स्वारस्य नाही.तडजोड करूया असा मी काही बोललो नाही.त्यांना अहवाल द्यायचा होता,तो मी दिला आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

