Wednesday, September 2, 2026
Homeगडचिरोलीअहेरी उपविभागातील धान खरेदीस मुदतवाढ..

अहेरी उपविभागातील धान खरेदीस मुदतवाढ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित,नाशिक (उच्च श्रेणी) आणि उप प्रादेशिक कार्यालय अहेरी (उच्च श्रेणी) यांच्या माध्यमातून खरीप हंगाम २०२४-२५ करिता अहेरी उपविभागात धान खरेदी केंद्रांवर सुरु असलेल्या खरेदी प्रक्रियेची मुदत ३१ मे २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा,आसरअल्ली,अमरादी, अंकीसा,वडधम, जाफ्राबाद,बामणी,पेटिपाका आणि विठ्ठलरावपेठा या नऊ खरेदी केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध राहणार आहे. संबंधित ठिकाणी टिडीसी गोदाम,एपीएमसी गोदाम,महात्मा गांधी गोदाम, ग्रामपंचायत गोदाम, वनविभागाचे गोदाम,कृषी गोदाम आणि शासकीय आश्रमशाळेतील गोदामांमध्ये धान खरेदी सुरू आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून धान विक्रीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.नोंदणीसाठी ई-पिक पत्रक (सातबारा,नमुना ८ अ),आधारकार्ड,बँक पासबुक,ई-केवायसी तसेच संमतीपत्र आवश्यक आहे.शेतकऱ्यांनी संपूर्ण कागदपत्रांसह वेळेत नोंदणी करून शासनाच्या आधारभूत दराने खरेदी योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन आदिवासी विकास महामंडळ अहेरीचे उप प्रादेशिक व्यवस्थापक बी.एस.बरकमकर यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!