Wednesday, September 23, 2026
Homeनागपूरचक्क पोलिस चौकीतच खेळू लागले जुगार... - दोन पोलीस अंमलदार तडकाफडकी निलंबित

चक्क पोलिस चौकीतच खेळू लागले जुगार… – दोन पोलीस अंमलदार तडकाफडकी निलंबित

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-आपण नेहमी बघत असतो की,जुगार खेळणारे एखाद्याच्या घरी,सार्वजनिक ठिकाणी वा कुठेतरी आडोशाला बसून जुगार खेळतांना आढळून येतात.मात्र,एका घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दोन पोलीस अंमलदार कर्तव्य बजावण्याचे सोडून चक्क पोलीस चौकीतच जुगार खेळत असल्याचा व्हिडिओ वायरल झाल्याने जुना कामठी रोडवरील कळमना पोलिस चौकीत जुगार खेळणाऱ्या दोन पोलिस अंमलदारांना झोन-५ चे पोलिस उपायुक्त अनिकेत कदम यांनी काल,सोमवारी तडकाफडकी निलंबित केले आहे.दरम्यान, जुगार खेळणाऱ्या दोन निलंबित पोलिसांव्यतिरिक्त आणखी किती पोलिस तेथे होते? याचा शोध घेण्यासाठी या प्रकरणाची चौकशी कामठी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त विशाल क्षीरसागर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
मनोज घाडगे आणि शाहू साखरे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिस अंमलदारांची नावे आहेत. कळमना पोलिस ठाण्यात दोन पोलिस अंमलदार वर्दी घालून जुगार खेळत असल्याचा व सिगारेट पित असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे नागपूर शहर पोलिस विभागात खळबळ उडाली.परंतु हा व्हिडीओ कळमना पोलिस ठाण्यातील नसून तो जुना कामठी मार्गावरील कळमना पोलिस चौकीतील असल्याचे उघड झाले आहे.
झोन ५ चे पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांनी या पोलिस चौकीला भेट देऊन पाहणी केली.ही पोलिस चौकी एक सिंगल रूम आहे.तेथे तक्रार देण्यासाठी कोणीही जात नाही.व्हिडीओत जुगार खेळताना घाडगे आणि शाहू साखरे यांच्यासोबत आणखी काही जणांचे आवाज ऐकू येत असल्यामुळे यात आणखी काही पोलिस सहभागी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
निकेतन कदम,पोलिस उपायुक्त,परिमंडळ ५,नागपूर शहर👇
पोलिसांचा गणवेश घालून पोलिस चौकीत जुगार खेळणे हा गुन्हा आहे.त्यामुळे संबंधितांविरुद्ध तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.जुगार खेळताना आणखी पोलिस होते काय याची सखोल चौकशी करण्यासाठी सहायक पोलिस आयुक्त विशाल क्षीरसागर यांच्याकडे चौकशी सोपविण्यात आली आहे,
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!