Monday, August 24, 2026
Homeचंद्रपूरग्रामपंचायतीच्या १४ वा वित्त आयोगाच्या निधीची संगणक परीचालकाने लावली वाट..ऑनलाईन जुगारावर ८...

ग्रामपंचायतीच्या १४ वा वित्त आयोगाच्या निधीची संगणक परीचालकाने लावली वाट..ऑनलाईन जुगारावर ८ लाखाच्या वर उडविली रक्कम….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मूल (चंद्रपूर) :- मूलतालुक्यातील जुनासुर्ला ग्रामपंचायत येथील संगणक परिचालकाने ग्रामपंचायतीच्या १४ वा वित्त आयोग बँक खात्यातील शिल्लक असलेला निधी थेट स्वतःच्या खात्यात वळती करून ऑनलाइन जुगारात उडविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून सदर घटनेने जिल्हा परिषद विभागात एकच खळबळ उडाली आहे.

ग्रामपंचायत जुनासूर्ला येथील १४ वा वित्त आयोगाचा कालावधी संपला.मात्र जुनासुर्ला ग्राम पंचायतीचा ८ लाख ४० हजार रुपयांचा निधी अखर्चित होता. शासनाने सदर आयोगातील निधी खर्च करण्यास एक वर्षांची मुदतवाढ दिली होती.संधीचा फायदा घेत संगणक परीचालक किशोर पाटेवार याने सरपंच व ग्रामसेवक दोघांच्या डीएससीचा डिजिटल सिग्नेचरचा गैरवापर करीत १४ वा वित्त आयोगातील ८ लाख २९ हजारांचा निधी टप्प्याटप्प्याने आपल्या स्वतःच्या बँकखात्यात वळती करून सदरची रक्क्म ऑनलाइन जुगारावर उडविली.सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी; अशी मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नालीच्या चेंबरवर मृतावस्थेत आढळला नवजात अर्भक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोखारा गावातील रस्त्यालगत असलेल्या नालीच्या चेंबरवर नवजात बाळाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

‘ई-पीक पाहणी’ मोबाईल ॲपच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका; गावनिहाय नियुक्त सहाय्यकच घेणार नोंदी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने यंदाच्या 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत  केलेला बदल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः मोबाइलवरून ई-पीक पाहणी करण्याची...

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!