Monday, May 25, 2026
Homeभंडारागोसेखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ; तब्बल ९ गेट ०.५० मीटरने उघडली..

गोसेखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ; तब्बल ९ गेट ०.५० मीटरने उघडली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :-जिल्ह्यास हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार सर्वदूर पाऊस कोसळत आहे.परत हवामान खात्याने पुढील पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.यापूर्वी हवामान खात्याने दिलेला अंदाज तंतोतंत खरा ठरत आहे.प्रशासनाने नदी काठावरील व सखल भागात पाणी शिरत असलेल्या घर परिसरातील नागरिकांना सतर्कतेची सूचना केली आहे. काल सोमवारी भंडारा शहरासह लाखनी,तुमसर,मोहाडी, साकोली,पवनी आणि लाखांदूर तालुक्यात पावसाच्या सरी बरसल्या.साकोली तालुक्यात बरसलेल्या मुसळधार पावसामुळे विशालकाय झाड विजेच्या विद्युत तारांवर कोसळले. यामुळे काहीकाळ विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.अश्यातच धरण क्षेत्रात गत काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील प्रमुख धरण असलेल्या गोसेखुर्द धरणाची ९ दारे पाणी पातळी समतल राखण्यासाठी उघडण्यात आली आहेत. ९ गेट ०.५० मीटरने उघडण्यात आली असून ११८७.१० क्युमेक्सने विसर्ग सुरू आहे.तर धापेवाडाचे ९ गेट ०.२ ने सुरू असून ८१४.७७ क्युमेक्सने विसर्ग सुरू आहे.सध्या स्थितीत संजय सरोवराचे पूर्ण गेट बंद असून विसर्ग नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!