Thursday, May 7, 2026
Homeभंडाराप्रेम भंग; विवाहित पुरुषाने गळफास लावून केली आत्महत्या..

प्रेम भंग; विवाहित पुरुषाने गळफास लावून केली आत्महत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-एका ४५ वर्षीय विवाहित पुरुषाचा पत्नी व्यतिरिक्त दुसऱ्याच तरुणीशी सुत जुळला.दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करू लागले.तब्बल दीड वर्ष प्रेमप्रकरण बहरून आला.अश्यातच गेल्या एका महिन्यापासून त्यांच्यात दुरावा निर्माण झाला.दुराव्यामुळे त्याची मानसिक स्थिती ढासळली आणि घरापासून अवघ्या दोन किलोमिटर अंतरावर असलेल्या करडी शेत शिवारातील कसईच्या झाडाला लालसर रंगाच्या ओढणीने स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली. श्रीकांत भाऊराव बोरकर वय ४५ वर्षे,रा.जांभोरा, ता.मोहाडी,जि.भंडारा असे आत्महत्या केलेल्या विवाहित पुरुषाचे नाव आहे.विशेष म्हणजे,आत्महत्येपूर्वी त्याने आपली सुसाईड नोट स्टेटसवर ठेवत अनेकांच्या मोबाइलवर पाठवली.ज्यात,माझ्या मृत्यूला प्रेयसीच कारणीभूत आहे; ज्या ओढणीने त्याने मृत्यूला कवटाळले,तीच ओढणी अंत्यसंस्कारापर्यंत अंगावर असावी,अशी करुण अंतिम इच्छा त्याने व्यक्त केली,नंतर पोलिसांनी ती सुसाईड नोट जप्त केली.सदरची घटना काल मंगळवारी सर्वत्र उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.घटनेची माहिती मिळताच करडी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर येथे पाठवला.या प्रकरणी ठाणेदार गोरक्षनाथ नागलोत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय हनुमंतराव फरताडे,हवालदार प्रफुल्ल वालदे पुढील तपास करीत आहेत.मृतक श्रीकांतच्या
पश्चात पत्नी,एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.त्याने परिवाराचा विचार न करता परस्त्रिसाठी एवढे मोठे टोकाचे पाऊल उचलल्याने बोरकर कुटूंबीय शोकसागरात बुडाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता राज्यातील सर्व शिक्षक,पर्यवेक्षक,मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापकांना दरवर्षी ५० तासांचे प्रशिक्षण अनिवार्य.. – शासन परिपत्रक जारी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे आणि निकालाची अपेक्षित टक्केवारी गाठता यावी यासाठी प्रत्येक शिक्षकाला दरवर्षी अद्ययावत शैक्षणिक...

सुडाने पेटलेला पुतण्या काकाला संपवूनच झाला शांत..!

उद्रेक न्युज वृत्त  कोरची(गडचिरोली):-शालेय शिक्षण घेत असतांना शिक्षक नेहमी सांगायचे, 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे' ज्याचे रागावर नियंत्रण आणि मनावर ताबा तो सर्वकाही...

राज्य शासनाची सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू करण्याबाबतची कार्यपध्दती जाहीर.. – शासन परिपत्रक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाची सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू करण्याबाबतची कार्यपध्दती राज्य सरकारने जाहीर केली असून याबाबत आज,बुधवार...

शासकीय जागेवरील अतिक्रमण भोवला; देसाईगंज तालुक्यातील सावंगीच्या थेट सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शासकीय जागेवर अतिक्रमण करणे एका महिला थेट सरपंचाच्या चांगलेच अंगलट आले आहे.सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी देसाईगंज तालुक्यातील सावंगी ग्रामपंचायतीच्या सरपंचा प्रभा मनोज...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!