Friday, September 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता 'वंदे मातरम्' गातांना अडथळा आणणे,अवमान करणे किंवा कार्यक्रमात अपमानास्पद वापर करणे...

आता ‘वंदे मातरम्’ गातांना अडथळा आणणे,अवमान करणे किंवा कार्यक्रमात अपमानास्पद वापर करणे ठणार दंडनीय गुन्हा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आपल्या देशाप्रती अनेकांना अभिमान वाटत असतो.त्यातच,अनेकांमध्ये देशभक्ती कुटून भरलेली असते.मात्र,देशभक्तीशी निगडित प्रतीकांचा सन्मान राखणे तितकेच महत्वाचे आहे. यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचा अपमान करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी  राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा,१९७१(The Prevention of Insults to National Honour Act,1971)या कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यास मंजुरी दिली आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंगळवार ५ मे रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.या दुरुस्तीमुळे ‘वंदे मातरम्’ गातांना अडथळा आणणे, त्याचा अवमान करणे किंवा कार्यक्रमात त्याचा अपमानास्पद वापर करणे हे आता दंडनीय गुन्हा ठरणार आहे. सध्याच्या कायद्यानुसार राष्ट्रगीत,राष्ट्रध्वज आणि राज्यघटनेचा अपमान केल्यास तीन वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा आहे.आता हाच नियम ‘वंदे मातरम्’ लाही लागू होणार असल्याने राष्ट्रीय गीतालाही समान कायदेशीर संरक्षण मिळणार आहे.यापूर्वी गृह मंत्रालयाकडून ‘वंदे मातरम्’ संदर्भात दिलेल्या सूचना केवळ सल्लागार स्वरूपाच्या होत्या.मात्र,नव्या दुरुस्तीमुळे या सूचनांना कायदेशीर बळ मिळणार आहे.
‘वंदे मातरम्’ हे प्रसिद्ध साहित्यिक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (चॅटर्जी)यांनी लिहिले असून ते त्यांच्या आनंदमठ या कादंबरीत प्रथम प्रकाशित झाले.स्वातंत्र्य चळवळीच्या काळात या गीताने देशभक्तीची भावना जागवण्यात मोठी भूमिका बजावली होती. १९३७ साली काँग्रेसने त्यातील पहिल्या दोन कडव्यांना मान्यता दिली आणि पुढे भारतीय राज्यघटनेने ‘राष्ट्रीय गीत’ म्हणून त्याला दर्जा दिला.अश्यातच ६ फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार,अधिकृत कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ची सर्व सहा कडवी म्हणजेच सुमारे ३ मिनिटे गायली किंवा वाजवली जावीत,असे सांगण्यात आले आहे.तसेच,ज्या कार्यक्रमात राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत दोन्ही असतील,तिथे ‘वंदे मातरम्’ला प्राधान्य देण्याचीही सूचना आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा येथील झुडपी जंगल परिसरावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आणि शेती कसत असलेल्या नागरिकांना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी...

शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी,यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया...

“आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; मला माफ करा” अशी चिठ्ठी लिहून वकिलाने घेतला गळफास.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुण वकिलाने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली.त्यात "आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,मला माफ करा.माझ्या बहिणीकडे...

पिसेवळधा ते भाकरोंडी रस्त्याची ‘ही’ अवस्था; विचार येतेय की कोणत्या ठिकाणी विकास होताय? -शहराचा विकास होत आहे,चांगली गोष्ट आहे; पण गाव खेड्याकडे पण लक्ष...

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यातला विकास होत आहे; पण याच्याकडे लक्ष देणार तरी कोण? रस्त्याची अवस्था पाहून विचार येतेय की,कोणत्या ठिकाणी विकास होताय गडचिरोली जिल्ह्याचा.कोणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!