- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-कोळसा भरून जाणाऱ्या ट्रेलरने दुचाकीवरून उपचाराकरिता जात असलेल्या पती-पत्नी स्वार असलेल्या दुचाकी वाहनास मागेहून जोरदार धडक दिल्याने ३५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला तर पतीच्या पायावरून ट्रेलरचे चाक गेल्याने पायाचा चुराडा झाल्याची घटना आज,रविवार १ डिसेंबर च्या सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास तुमसर शहाराजवळील माडगी गावातील चौकात घडली.वैशाली बामचंद रहांगडाले रा.सीतेपार ता.तिरोडा,जिल्हा-गोंदिया असे मृतक महिलेचे नाव असून पती बामचंद रहांगडाले वय ३७ वर्षे गंभीर जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार,मृतक वैशाली रहांगडाले ही पती बामचंद रहांगडाले यांच्यासोबत दुचाकी पल्सर एम एच ३५ ए एफ ५०४५ ने तुमसर येथे आर्थो स्पेशालिस्ट डॉक्टर टेंभुर्णेकडे तपासणी करिता जात असतांना गोंदियाकडून नागपूरकडे जाणाऱ्या एम एच ४० सी एम ८९२८ कोळशाच्या ट्रेलरने मागून जोरदार धडक देऊन पत्नी वैशालीला चिरडत नेले.तर पती बामचंद हा गाडी घेऊन फेकल्या गेला.यात वैशालीचा जागीच मृत्यू झाला.तर बामचंदच्या पायावरून ट्रेलरचे चाक गेल्याने पायाचा चुराडा झाला.
ट्रेलर चालक घटनास्थळी गाडी सोडून फरार झाला. घटना घडताच माडगी गावातील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.काही काळ गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.याबाबत नागरिकांनी
तुमसर पोलिसांना घटनेची माहिती दिली.पोलिसांनी मृतकाचा पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविले.पती गंभीर जखमी असल्याने त्याला भंडारा येथे रेफर करण्यात आले.पोलिसांनी ट्रक पोलीस स्टेशन येथे घेऊन चालक मुकेश कुमार विश्वकर्मा वय ३६ वर्षे रा. नागपूर याला ताब्यात घेऊन यावर कलम २८१,१२५ (ए) (बी)१०६ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
- Advertisement -

