Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूरकुष्ठरोग निवारण दिनानिमित्य कुष्ठरोग जनजागृती रॅलीचे आयोजन…..

कुष्ठरोग निवारण दिनानिमित्य कुष्ठरोग जनजागृती रॅलीचे आयोजन…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम,सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्था,अलर्ट इंडिया मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कुष्ठरोग निवारण दिवसाच्या निमित्याने “करू कुष्ठ कलंकाचे निर्मूलन, देऊ प्रतिष्ठेला आलिंगण” या नुसार ग्रामीण रुग्णालय सावली येथून रॅली चे आयोजन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.धनश्री अवघड,तालुका आरोग्य अधिकारी सावली,प्रमुख पाहुणे डॉ.देशमुख,वैद्यकीय अधिकारी  ग्रामीण रुग्णालय सावली, महादेव चौधरी  सदस्य सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्था नागभीड, धारने कुष्ठरोग तंत्रज्ञ, आकुलवार आरोग्य सहाय्यक,ठाकरे आरोग्य सेवक, संदीप माटे प्रकल्प समन्वयक यांची उपस्थिती होती. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली.डॉ.अवघड मॅडम  यांनी आजाराला  लपवुन न ठेवता वेळेवर उपचार केले तर कुष्ठरोग पूर्ण बरा होऊ शकतो, विक्रुतीची जोपासना केली तर ती विक्रुती पुर्णपणे बरी होवू शकते; असे मार्गदर्शन केले. काही वैद्यकीय समस्या असल्यास कुष्ठरोग संदर्भ सेवा केंद्रातील सेवा घेण्याचे आवाहन करण्यात आले. महादेव चौधरी यांनी चार भिंतींच्या आत न राहता आपल्या हक्क व अधिकारासाठी बाहेर येणे गरजेचे आहे तेव्हाच  प्रश्न सुटतील असे मार्गदर्शन केले.  धारणे यांनी कुष्ठरोग सर्वसामान्य आजार आहे व यावर रामबाण उपचार आहे.असे सांगितले तसेच तालुक्यातील बहुसंख्येने ८० पेक्षा अधिक कुष्ठांतेय कार्यक्रमाला उपस्थित होते त्यामुळे त्यांचे आभार मानले.डॉ.अवघड मॅडम यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली.ही रॅली ग्रामीण रुग्णालय पासून तर हायवे रोडवरून मुख्य बाजारपेठेतून सावली शहरात काढन्यात आली.या रॅली मध्ये लवकर कुष्ठरोग निदान व उपचार करण्या संदर्भात तसेच कुष्ठांतेयासोबत घृणा,कलंक भेदभाव करू नये;  या संदर्भात घोष वाक्यानी व गाण्यानी जनजागृती करण्यात आली. 

कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी  वर्षानूवर्षे  पायाला असलेल्या जखमा पीओपीच्या माध्यमातून बरी केलेले सुरेश गेडकर,ताराचंद करकाडे,स्वनिगेने जखम बरी केलेले शोभा गुरनुले,पायाचा फुडड्रॉप बरी केलेले बंडू मेश्राम,हाताचा मोबाईल क्ला बरा केलेले अमोल चौधरी अशा कुष्ठांतेयाचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाचे संचालन प्रशांत बाबनवाडे तर आभार मिलिंद बारसिंगे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी ते करिता सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेचे श्रावण हांडेकर, अश्विनी नन्नावरे,झामदेवजी कोठेवार तसेच अलर्ट इंडिया मुंबईचे  दिवाकर सोनबावणे,कविता रामटेके, युवराज शेंडे,राजेश गड्डमवार,श्रीकृष्ण निकुरे,सपना कंकडालवार,लता तुनकलवार,वैशाली देशमुख,  यांनी सहकार्य केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!