उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- धान्य विक्रीसाठीऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख ३१ जानेवारी रोजी संपुष्टात आली असल्याने बऱ्याच पैकी शेतकरी बांधवांनी धान्य विक्रीसाठी खरेदी केंद्रावर नेले नसल्याची बाब निदर्शनास येऊ लागल्याने परत पुन्हा १५ दिवस म्हणजेच २९ फेब्रुवारी पर्यंत धान खरेदीला मुदतवाढ देण्यात आली असल्याने शेतकरी बांधवांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.
शासकीय खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत कमी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती.ऑनलाइन नोंदणीची मुदतवाढ ३१ जानेवारी पर्यंत वाढवून देण्यात आल्याने धान खरेदी ९ नोव्हेंबर ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत निश्चित करण्यात आली होती.मात्र देण्यात आलेली मुदतवाढ संपल्याने शासकीय खरेदी केंद्रावर धान विक्रीचा पेच शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला होता.एकीकडे ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ दिलेली असताना व दुसरीकडे धान खरेदी पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बरेच दिवस धान खरेदी ठप्प राहिली. त्यामुळे ऑनलाइन नोंदणीपासून वंचित राहिलेले शेतकरी शासकीय खरेदी केंद्रावर धान विक्रीपासून वंचित राहू नये; याकरिता ऑनलाइन नोंदणीची १५ दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे.गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी केवळ शेतीवर अवलंबून असुन मोठ्या प्रमाणात शेतकरी रब्बी धान पिकाच्या लागवडीत व्यस्त असतात.अनेक शेतकरी धान विक्रीसाठी शासकीय खरेदी केंद्रावर धान नेऊ शकले नाहीत.त्यामुळे संबंधित शेतकरी किमान आधारभूत धान खरेदी योजनेपासून वंचित राहिल्याने मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली होती.मुदत वाढीमुळे वंचित असलेले शेतकरी धान्य विक्रीसाठी मुकणार नाहीत.

