Thursday, June 4, 2026
Homeचंद्रपूरकार्यालयीन वेळेत उपस्थित नसणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांचा क्लास..!

कार्यालयीन वेळेत उपस्थित नसणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांचा क्लास..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्यातच नव्हे तर बऱ्याच ठिकाणी कार्यालयीन वेळ होऊनही अधिकारी,कर्मचारी कार्यालयात उपस्थित होत नाही.यामुळे नागरिकांची कामे वेळेत न होता खोळंबली जाऊन अनेकांना अधिकारी, कर्मचाऱ्यांची वाट पाहून ताटकळत बसावे लागते.हल्ली शासनाने पाच दिवसांचा आठवडा करून कार्यालयीन वेळेत बदल केला आहे.सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ वाजे पर्यंत कार्यालयात अधिकारी,कर्मचारी उपस्थित असायला हवी.मात्र,अनेक अधिकारी,कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसतात.अश्याच प्रकारे आज,सोमवार १५ डिसेंबर हा कार्यालयाचा आठवड्यातील पहिला दिवस असतांनाही काही अधिकारी,कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित न झाल्याने चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त आयएएस अधिकारी नरेश आकनुरी यांनी त्यांचा चांगलाच क्लास घेतला.
सकाळच्या अधिकृत कार्यालयीन वेळेत आयुक्त नरेश अकनुरी महानगरपालिकेत दाखल झाले.मात्र,बहुतांश अधिकारी कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.संतप्त झालेल्या आयुक्तांनी थेट महानगरपालिकेचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याचे आदेश दिले.काही वेळाने अधिकारी व कर्मचारी कार्यालयात पोहोचले असता त्यांना प्रवेशद्वार बंद असल्याचे आढळून आले.या कृतीने महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती. आयुक्त नरेश अकनुरी नरेश यांनी दिलेल्या या धक्क्यामुळे महानगरपालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.काही वेळाने लेट लतीफांचा क्लास घेतल्यावर सर्वांच्या नोंदी घेत त्यांना रुजू करून घेण्यात तर आले,पण लेट लतिफ अधिकारी,कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा; मोठा औषध साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय खोटे दावे करणे आणि जाहिरात करून औषध विकणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा असूनही काहीजण आक्षेपार्ह जाहिराती तसेच निकृष्ट दर्जाची...

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

जिल्हास्तरीय युवा पुरस्कार २०२५-२६ साठी प्रस्ताव स्वीकारण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे यांच्या वतीने राज्याचे युवा धोरण २०१२ अन्वये जिल्हास्तरीय युवा पुरस्कार सन २०२५-२६ साठी पात्र...

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!